Xiaomi ने चीनमध्ये आपला नवीन Redmi Smart TV लाँच केला आहे. नवीन Redmi Smart TV A70 चीनमध्ये ७० इंच स्क्रीनसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. Redmi Smart TV A70 मध्ये 4K रिझोल्यूशन असलेली स्क्रीन आहे. रेडमीचा नवीनतम स्मार्ट टीव्ही नवीन मेटल युनिबॉडी डिझाइनसह बनविला गेला आहे. Xiaomi ने हा टीव्ही जवळपास ३५,००० रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. टीव्ही २०वोल्ट साउंड आउटपुट, व्हॉइस कंट्रोल आणि इंटेलिजेंट स्क्रीन प्रोजेक्शन यांसारख्या वैशिष्ट्यांसह देखील येतो. रेडमीच्या नवीन स्मार्ट टीव्हीच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

Redmi Smart TV A70 किंमत

Redmi Smart TV A70 ची किंमत २,९९९ RMB म्हणजेच सुमारे ३५,००० किंमतीचा आहे. हा Redmi फोन चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Xiaomi कडून जागतिक बाजारपेठेत Redmi Smart TV A70 च्या उपलब्धतेबद्दल सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

( हे ही वाचा: आता iPhone 13 Mini खरेदी करा फक्त अर्ध्या किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची ‘दिवाळी धमाका ऑफर’)

Redmi Smart TV A70 तपशील

नवीन Redmi Smart TV A70 मध्ये 4K (३८४०×२१६० पिक्सेल) रिझोल्यूशन डिस्प्ले पॅनेलसह ७० इंच स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये अतिशय पातळ बेझल्स देण्यात आले आहेत. स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९६ टक्के आहे. रेडमी टिव्हीमध्ये १० बिट डिस्प्ले पॅनल आहे जे १७८ डिग्री व्ह्यूइंग अँगल देते. नवीनतम रेडमी स्मार्ट टीव्हीमध्ये क्वाड-कोर कॉर्टेक्स प्रोसेसर आहे. माली GPU ग्राफिक्ससाठी उपलब्ध आहे. रेडमी स्मार्ट टीव्हीमध्ये १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. टीव्ही Android आधारित MIUI टीव्हीसह येतो.

Redmi Smart TV A70 मध्ये २०वोल्टचा साऊंड आउटपुट उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये २.४ GHz Wi-Fi 802.11 AC, दोन HDMI, दोन USB, इथरनेट आणि AV इनपुट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. नवीनतम रेडमी टीव्हीमध्ये व्हॉईस कंट्रोल, टीव्ही स्क्रीन शॉट आणि इंटेलिजेंट स्क्रीन प्रोजेक्शन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Xiaomi चा हा स्मार्ट टीव्ही App Store, Mijia Home, HD Player, TV Butler, Calender आणि Weather सारख्या अॅप्ससह पूर्व-इंस्टॉल केलेला आहे.