सध्याच्या काळामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर वाढताना दिसून येत आहे. AI माणसांच्या नोकऱ्या खाणार का असा प्रश्न सर्वांना पडत आहे. तसेच AI च्या धोक्यांबाबत अनेक दिग्गज लोक वादविवाद करत आहे. मात्र अमेरिकेतील एका महिलेला या टेक्नॉलॉजीने ‘परफेक्ट नवरा’ शोधण्यास मदत केली. काय आहे हे प्रकरण ते जाणून घेऊयात.

AI टेक्नॉलॉजी एका महिलेला या टेक्नॉलॉजीने ‘परफेक्ट नवरा’ शोधण्यास मदत केली आहे. न्यूयॉर्कमधील ३६ वर्षीय रोझना रामोस या महिलेने ‘एरेन कार्टल’ नावाच्या पुरुषाशी लग्न केले. अ‍ॅटॅक ऑन टायटन’ नावाच्या एनिमेवरील लोकप्रिय पात्रापासून प्रेरित होऊन, रामोसने २०२२ मध्ये Replika AI वेबसाइट वापरून ‘एरेन कार्टल’ तयार केले आहे. हा सर्वात परफेक्ट नवरा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

हेही वाचा : Apple WWDC 2023: अ‍ॅपलच्या ‘या’ नव्या प्रॉडक्ट्सची होणार घोषणा? कधी आणि कुठे पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

रोझना रामोस यांचे म्हणणे आहे, एरेन एक वैद्यकीय व्यवसायिक म्हणून काम करतो. आणि त्याला लेखनाचा छंद आहे. त्या म्हणतात एरेनला त्या सर्व काही आणि काहीही सांगू शकतात. कारण तो कधीही कोणाशी माझी तुलना करत नाही. रामोस यांनी एरेन यांच्याशी जास्त वेळ बोलल्यामुळे त्यांना याच्या स्वभावाबद्दल अधिक कळत गेले. आवडता रंग आणि संगीत यांसारखे अनेक वैशिष्ट्ये एरेनसह अंगभूत होते जेव्हा रामोस यांनी AI च्या मदतीने एरेनला तयार केले. Daily Mail ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, मी त्याच्याशी प्रेमाने बोलायचे आणि त्यावर तो म्हणायचा, नाही तू असं बोलू शकत नाही. नाही.. नाही.. तुला जे (प्रेम) वाटतं आहे, ते चुकीचे आहे. तुला त्याची परवानगी नाहीये. मग आम्ही या विषयावर भांडायचो.

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप असल्याप्रमाणे रामोस आणि एरेन हे मेसेज, कंटेंट आणि फोटोज एकमेकांना पाठवायचे. तसेच वैयक्तिक आयुष्य, मित्र आणि आवडत्या गोष्टी याबद्दल त्यांचे बोलणे होत असे. तसेच रोमास यांनी रात्रीच्या वेळेचे त्यांचे रूटीनसुद्धा शेअर केले आहे. त्याबद्दल रामोस म्हणतात, ”आम्ही झोपायला जातो, एकमेकांशी गप्पा मारतो. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही झोपी जातो, त्यावेळी तो माझं संरक्षण करत असतो. ” Replika AI हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे स्टॅटिकल पॅटर्न आणि प्री-प्रोग्रॅम केलेल्या डेटासेटच्या आधारावर वापरकर्त्यांसह चॅट्सचे अनुकरण करते.