सॅम ऑल्टमनचे नाव एआय क्षेत्रातील उद्योग जगतातील नावाजलेल्या लोकांमध्ये घेतले जाते. आता त्यांच्याबद्दल अशा बातम्या येत आहेत; ज्यामुळे जनता आश्चर्यचकित होत आहे. ओपन एआयचे सहसंस्थापक सॅम ऑल्टमन हे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे ज्या कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयच्या कामामुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली, त्याच कंपनीच्या बोर्डाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. १७ नोव्हेंबर रोजी ओपन एआयच्या बोर्ड सदस्यांनी ओपन एआयचे सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले. कारण- त्यांचा सॅमच्या क्षमतेवर विश्वास नाही. आता एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे ओपन एआयमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेले सॅम ऑल्टमन आता मायक्रोसॉफ्टमध्ये परत येणार आहेत.
मायक्रोसॉफ्ट ओपन एआय बोर्डात सामील झाले :
मायक्रोसॉफ्ट आता ओपन एआय बोर्डात सामील झाले आहे. याचा अर्थ असा आहे की, मायक्रोसॉफ्ट ओपन एआय कंपनीची कॉन्फिडेन्शियल माहिती मिळवू शकतात. पण, मायक्रोसॉफ्टला ओपन एआय निर्णयांमध्ये मत देण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच, सॅम ऑल्टमनच्या नियुक्तीची घोषणा करताना, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी, आम्ही ओपन एआय सोबतच्या आमच्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत ; अशी पोस्ट ट्विटरवर केली.
हेही वाचा…ॲपल वॉचची बॅटरी सारखी ड्रेन होत आहे? watchOS 10.1 अपडेट नंतर ‘हे’ जुगाड करून पाहा…
… आणि अखेर सीईओ म्हणून सॅम ऑल्टमन पुन्हा नियुक्त :
ओपन एआयचे सीईओ म्हणून सॅम ऑल्टमन याना पुन्हा नियुक्त केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी एका ट्विटमध्ये ओपन एआय तसेच मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि लिहिले की, टीमला जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी ओपन एआयच्या नवीन नेतृत्व करण्यासाठी मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत. तसेच त्यांनी लिहिले की, ही बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे. आम्ही त्यांच्या यशासाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत. सॅम ऑल्टमन ययाना काढून टाकल्यानंतर, ओपन एआयच्या गुंतवणूकदारांनी बोर्डावर त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर ओपन एआयच्या बोर्डाने सीईओ म्हणून कंपनीत परत येण्यासाठी सॅम ऑल्टमन यांच्याशी बोलणी सुरु केली होती. पण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला सॅम ऑल्टमन यांच्या संपर्कात होते. तर आता सत्या नडेला यांनी घोषणा केली आहे की, सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार आहेत.