scorecardresearch

Premium

सॅमसंगचा HOLI धमाका ऑफर, स्मार्ट टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन यांसारख्या उत्पादनांवर मिळवा बंपर डिस्काउंट

सॅमसंगचे ऑनलाइन स्टोअर आणि सर्व रिटेल स्टोअर्स स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीज यांसारख्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. दरम्यान सॅमसंगच्या ‘ब्लू फेस्ट’ या सेलमध्ये या ऑफर देण्यात येत आहे.

१२ मार्चपासून सॅमसंगने 'ब्लू फेस्ट' सेलची घोषणा केली आहे. (photo credit: indian express)
१२ मार्चपासून सॅमसंगने 'ब्लू फेस्ट' सेलची घोषणा केली आहे. (photo credit: indian express)

होळीच्या सणांनिमित्त जर तुम्ही तुमच्या घरासाठी काही नवीन उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग तुम्हाला या कामात मदत करू शकते. कारण सॅमसंगचे ऑनलाइन स्टोअर आणि सर्व रिटेल स्टोअर्स स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीज यांसारख्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. दरम्यान सॅमसंगच्या ‘ब्लू फेस्ट’ या सेलमध्ये या ऑफर देण्यात येत आहे. चला तर मग या सेलमध्ये समाविष्ट असलेल्या ऑफर आणि डील्सवर एक नजर टाकूया.

सॅमसंगचा ‘ब्लू फेस्ट’ सेल

१२ मार्चपासून सॅमसंगने ‘ब्लू फेस्ट’ सेलची घोषणा केली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या घरगुती उपकरणांवर जबरदस्त सूट दिली जात आहे. सॅमसंगची ही विशेष विक्री ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहील आणि यामध्ये तुम्हाला झटपट सवलत मिळेल आणि अतिरिक्त कॅशबॅक तसेच सुलभ EMI आणि शून्य डाउनपेमेंट पर्याय दिले जातील.

Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास
new FPI scam sebi
नव्या FPI फसवणुकीबाबत सेबीकडून गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा; नेमकी फसवणूक कशी करतात?
mutual fund analysis, Invesco India Large Cap Fund, investment
Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड
mutual funds
Money Mantra : माझा पोर्टफोलियो : जगमान्य नाममुद्रांची विक्रेता फायदेमंद स्मॉल कॅप

स्वस्तात खरेदी करा स्मार्ट टीव्ही आणि एसी

‘ब्लू फेस्ट’ दरम्यान, तुम्ही जर Samsung Neo QLED, QLED आणि Crystal 4K UHD टीव्ही खरेदी करू इच्छिता तर तुम्हाला या प्रीमियम श्रेणी २५ टक्के पर्यंत झटपट सवलत, तसेच २० टक्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि शून्य डाउनपेमेंट यासारख्या सुलभ पेमेंट पर्यायांसह खरेदी करता येणार आहे. AC बद्दल सांगायचे तर, विंडफ्री एअर कंडिशनर्स खरेदी करताना, तुम्हाला २० टक्यांपर्यंत कॅशबॅक, ९९० रुपयांची सुरुवातीचा EMI आणि पाच वर्षांची कॉम्प्रीहेन्सिव वॉरंटी यासारख्या वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.

वॉशिंग मशीन आणि फ्रीजवरही सवलत आहे

जर तुम्ही चांगली वॉशिंग मशिन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर AI EcoBubble Front Load Washing Machine रेंज २९,९०० रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर, या डीलमध्ये तुम्ही २० टक्के कॅशबॅक, शून्य डाउनपेमेंट आणि ९९० रुपयांच्या पहिल्या EMI पासून सुरू होणारे फायदे देखील मिळवू शकता.

दरम्यान अशा ऑफर्स तुम्हाला फ्रीजवरही मिळतील. डिजी-टच कूल ५-इन-१ सिंगल डोअर रेफ्रिजरेटर १६,७०० रुपयांच्या आकर्षक किमतीत खरेदी केले जाऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला १० टक्यांपर्यंत कॅशबॅक तसेच ९९० रुपयांची EMI आणि शून्य डाउनपेमेंट सारखे पर्याय देखील मिळतील.

सॅमसंगचा हा ब्लू फेस्ट सेल ३० एप्रिल २०२२ पर्यंत सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये आणि देशातील सर्व लहान-मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये लाइव्ह असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samsung blue fest sale 12 march to 30 april 2022 buy smart tv washing machines ac at great discounts scsm

First published on: 15-03-2022 at 17:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×