सॅमसंग गॅलेक्सी A१३ चे स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या कसे असतील फीचर्स

स्मार्टफोनमध्ये ऑडिओसाठी ३.५mm हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे.

technology
Samsung Galaxy A13 स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. (photo: jansatta)

सॅमसंग गॅलेक्सी A१३ स्मार्टफोन लॉंच होण्यापूर्वी इंटरनेटवर त्याच्याशी संबंधित अनेक तपशील लीक झाले आहेत. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की Samsung Galaxy A13 स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि प्लास्टिक बिल्डसह येईल. त्याचबरोबर सॅमसंगकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यासोबतच सॅमसंगने Galaxy A13 चे प्रोडक्शन नोएडामध्ये सुरू केल्याचे बोलले जात आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनशी संबंधित सर्व तपशील.

सॅमसंग गॅलेक्सी A१३ ला ५जी कनेक्टिव्हिटी मिळू शकते

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या गॅलेक्सी A१३ स्मार्टफोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होऊ शकते. यासोबतच ग्लॉसी फिनिशसह प्लॅस्टिकचा मागील पॅनलही दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी A१३चे स्पेसिफिकेशन

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये व्हर्टिकल अलाइन क्वाड रिअर कॅमेरा सेटअप, यूएसबी टाइप-सी पोर्ट असू शकतो. त्याच वेळी, स्मार्टफोनमध्ये ऑडिओसाठी ३.५mm हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय गॅलेक्सी A१३ च्या तळाशी लाऊडस्पीकर ग्रिल देण्यात येईल.

दुसरीकडे, सॅमसंग गॅलेक्सी A१३ चे ४ जी फोन मॉडेल क्रमांक SM-A135F सह येऊ शकतो, तर त्याच्या ५ जी (5G) प्रकारात मॉडेल क्रमांक SM-A136B असण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी A१३ ५जी बद्दल असाही अंदाज लावला जात आहे की हा कंपनीचा सर्वात स्वस्त ५जी फोन असणार आहे. याबाबत असेही वृत्त आहे की याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असेल. फोनमध्ये Octa-core MediaTek Dimensity ७०० प्रोसेसरसह येऊ शकतो.

दुसरीकडे, या स्मार्टफोनच्या बॅटरी आणि चार्जरबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच कंपनी स्मार्टफोनमध्ये किती रॅम आणि स्टोरेज देईल याची माहिती समोर आलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samsung galaxy a13 leaked specifications know when will be launch scsm