या वर्षामध्ये अनेक स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केले गेले आहेत. तसेच पुढेही अनेक कंपन्या आपले स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. मात्र नुकताच सॅमसंगने आपला Galaxy M34 5G लॉन्च केला आहे. तर दुसरीकडे iQOO ने Neo 7 Pro 5G हा फोन लॉन्च केला आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणता फोन बेस्ट आहे ,त्याचे फीचर्स किंमत काय आहे हे जाणून घेऊयात.

सॅमसंग Galaxy M34 5G चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग Galaxy M34 5G वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिग्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. डिस्प्लेला गोरिला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आले आहे. हा फोन 5nm Exynos 1280 चिपसेटद्वारे समर्थित आहे . यामध्ये तुम्हाला वापरण्यासाठी ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात साईड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित One UI वर चालतो.

Hyundai Alcazar Facelift New Tvc Released With Brand Ambassador Shahrukh Khan
Hyundai Alcazar Facelift: नवीन ह्युंदाई अल्काझार कारची मार्केटमध्ये जोरदार चर्चा; शाहरुख खानसोबतचा नवा व्हिडिओ समोर
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Skoda Kylaq spotted testing: New details revealed Know Features & Design Details
Skoda Kylaq: टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली स्कोडा Kylaq; मिळणार अनेक नवीन बदल, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Jugaad Video | how to clean charger cable with the help of toothpaste
टूथपेस्टच्या मदतीने फक्त एक मिनिटामध्ये चार्जर केबल करा स्वच्छ, पाहा अनोखा जुगाड, VIDEO VIRAL
Startups like Ola Electric Mobility FirstCry and Unicommerce which sold shares responded to the IPO
दमदार बाजार पदार्पणाचे नवउद्यमींमध्ये नव्याने पर्व; ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय, युनिकॉमर्सची सूचिबद्धता फलदायी
two young guys fight on petrol pump
रांगेत उभे राहूनच पेट्रोल भरा! पेट्रोल पंपावर दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडीओ होतोय व्हायरल
Bangalore Bus Conductor video viral
Video : हिंदीत नाही कन्नडमध्ये बोला; बेंगळुरूमध्ये बस कंडक्टर प्रवाशाविरोधात आक्रमक
Amazon Great Freedom Festival sale 2024
Amazon: नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, वॉशिंग मशीन घ्यायची आहे? ॲमेझॉनवर मिळेल बेस्ट डील; पाहा कधी सुरू होणार ‘हा’ सेल

हेही वाचा : VIDEO: Samsung च्या ‘या’ फोनमध्ये मिळणार दोन दिवसांचा जबरदस्त बॅटरी बॅकअप, एकाचवेळी घेता येणार ४ व्हिडीओ आणि…

iQOO Neo 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Galaxy M34 5G चा कॅमेरा

सॅमसंगने लॉन्च केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मॉन्स्टर शॉट २.० फीचरला सपोर्ट करतो. ज्यामुळे वापरकर्त्याला एका शॉटमध्ये ४ व्हिडीओ आणि ४ फोटो कॅप्चर करता येतात. सेल्फीसाठी यामध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

iQOO Neo 7 Pro चा कॅमेरा

या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला आपला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; केवळ ८ मिनिटांमध्ये होणार…, ऑफर्स एकदा बघाच

सॅमसंग Galaxy M34 5G मध्ये ६००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्याला २५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याला चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट येतो. एकदा चार्ज केल्यावर या फोनची बॅटरी २ दिवस टिकू शकते असा कंपनीचा दावा आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, iQOO Neo 7 Pro 5G ची बॅटरी ८ मिनिटात ५० टक्के तर ३० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होऊ शकते.

iQOO Neo 7 Pro 5G किंमत आणि ऑफर्स

iQOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. तसेच या फोनची विक्री १५ जुलैपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच तो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.

कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर खरेदीदारांना ICICI बँक आणि SBI बँक कार्डवर २ हजार रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. तसेच दोन्ही मॉडेल्सवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

सॅमसंग Galaxy M34 5G ची किंमत

सॅमसंग Galaxy M34 5G हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंत १८,९९९ रुपये आहे तर ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत २०,९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर खरेदीदारांना २ हजार रुपयांची बँक ऑफर मिळणार आहे. हा फोन खरेदीदारांना मिडनाईट ब्लू, प्रिझम सिल्व्हर आणि वॉटरफॉल ब्लू या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

हा स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. Galaxy M34 5G ची विक्री Amazon, Samsung आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर १५ जुलैपासून सुरु होणार आहे. १५ आणि १६ जुलै रोजी Amazon चा प्राईम डे सेल होणार आहे.