Samsung एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. लवकरच कंपनी एक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे. सॅमसंग आपला मिड-रेंज Galaxy M34 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. हा फोन ७ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. सॅमसंग आपला मिड-रेंज Galaxy M34 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. हा फोन ७ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६००० mAh क्षमतेची बॅटरी, १२० Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकते. हा फोन Samsung Galaxy S23 सारखा दिसत आहे.

कंपनीच्या म्हह्ण्यानुसार, स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यास २ दिवस टिकू शकते. तसेच Galaxy M34 5G एक फन मोड देईल त्यामध्ये १६ वेगवेगळ्या इनबिल्ट लेन्स इफेक्ट आला जाईल. वेबसाईटवर असलेल्या टीझरनुसार, सॅमसंग Galaxy M34 5G अ‍ॅमेझॉन इंडिया या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Gautam Gambhir Instagram post for Fan Girl
‘जोपर्यंत गंभीर हसत नाही…’ चाहतीच्या ‘त्या’ पोस्टरला गौतमने दिले उत्तर, इन्स्टाग्रामवर शेअर केलेला खास फोटो व्हायरल
cut job in walmart
‘वॉलमार्ट’मध्ये नोकरकपातीचे वारे
lic gets 3 year extension from sebi to achieve 10 percent minimum public shareholding
किमान सार्वजनिक भागधारणा वाढवण्यासाठी ‘एलआयसी’ला मुदतवाढ
Loksatta anvyarth Airline strike over pay disparity dispute
अन्वयार्थ: वेतनविसंगतीच्या वादापायी विमान वाहतुकीचा विचका
News anchor news
“क्लिवेज नाईटक्लबसाठी असतात”, ट्रोल झाल्यानंतर टीव्ही अँकरने दिलं चोख उत्तर, कपड्यांवरून पात्रता ठरवणाऱ्यांना महिलांनी अशीच शिकवावी अद्दल!
Two-Wheeler Sales April 2024
हिरोच्या बाईक सोडून आता पहिल्यादांच ‘या’ कंपनीच्या बाईक स्कूटर्सच्या मागे लागले भारतीय, झाली दणक्यात विक्री
temperature affect the battery of mobile phones
विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…
Amazon Great Summer Sale Start On May Second hundreds of deals across various product categories
अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन, स्मार्टवॉच, आयपॅड, खरेदी करण्याची संधी; कधी सुरु होणार सेल ? जाणून घ्या

हेही वाचा : YouTube कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने अनेक भाषांमध्ये डब करता येणार व्हिडीओ

सॅमसंग Galaxy M34 5G चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

टीपस्टर अभिषेक यादव यांच्या मते, आगामी सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा FHD+ sAMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्याला १२० Hz रिफ्रेश रेट असू शकतो. तसेच यामध्ये MediaTek Dimensity 1080 chipset प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच Galaxy M34 5G अँड्रॉइड 13 OS वर चालेल अशी अफवा आहे. यामध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असेल.

तसेच सॅमसंगच्या या फोनमध्ये फोटग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ आणि ५ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. तसेच याला ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि २५ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. कनेक्टव्हिसाठी Galaxy M34 5G वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी, यूएसबी 2.0 टाइप-सी पोर्ट असे फीचर्स मिळू शकतात.

हेही वाचा : ग्राहकांसाठी खुशखबर! Apple च्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर फ्लिपकार्टवर मिळतोय भरघोस डिस्काउंट, एकदा ऑफर्स पहाच

अपेक्षित किंमत

सॅमसंग Galaxy M34 5G ची भारतातील किंमत सुमारे २५ हजार रुपये असण्याची अपेक्षा आहे अशी माहिती MySmartPrice ने दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे Galaxy M33 5G भारतात १८,९९९ सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता.