सॅमसंग कंपनी मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील एक प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच २ नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G हे दोन स्मार्टफोन कंपनीने लाँच केले आहेत. “सॅमसंगद्वारे, भारतामध्ये 5G डिव्‍हाइसेसच्या विस्तृत पोर्टफोलिओसह, 5G च्या अंगिकारास प्रोत्साहित केले जात आहे. Galaxy A14 5G आणि A23 5G लाँच केल्यामुळे, सॅमसंगकडे आता देशात 5G डिव्‍हाइसेसचे विस्‍तृत वितरण असेल, असे सॅमसंग इंडियाच्या मोबाइल बिझनेसचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी सांगितले.

Samsung Galaxy A14 5G

सॅमसंग ने Samsung Galaxy A14 5G हा स्मार्टफोन लाँच केला असून, त्यामध्ये ६.६ इंचाचा एचडी स्क्रीन येते. त्याचा रिफ्रेश रेट हा ९०Hz इतका आहे, बॅकसाईडचा कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेले आहे. सेल्फी कॅमेरा हा १३ मेगापिक्सलचा आहे. या फोनची बॅटरी ५००० mAh इतक्या क्षमतेची आहे. १५ वॅट चा चार्जिंग सपोर्ट येतो. फिंगरप्रिंट सेन्सर येते. १६ जीबी रॅम येते.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Suzuki V Strom 800DE launch
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, सुझुकी कंपनीची नवी कोरी बाईक भारतात दाखल, किंमत…

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: ‘या’ उपकरणांवर मिळतेय ‘इतकी’ सूट; जाणून घ्या

Samsung Galaxy A23 5G

Samsung Galaxy A23 5G या समर्टफोनमध्ये ६.६ इंचाचा एफएचडी स्क्रीन येते. २५ वॅटचा चार्जिंग सपोर्ट येतो. याच्या बॅटरीची क्षमता ही ५००० mAh इतकी आहे. ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटप असून , सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. याची रॅम ही १६ जीबी आहे.

जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy A14 5G हा स्मार्टफोन टीम प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. बेस मॉडेल हे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेचे असून त्याची किंमत १६,४९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १८,९९९ रुपये आहे. तसेच टॉप मॉडेलची किंमत ही २०,९९९ असून त्यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज येते. SBI, IDFC और ZestMoney वरून हा फोन खरेदी केल्यास १५०० रुपयांचा कशीबॅक देखील मिळणार आहे. डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये मिळणार आहे.

Samsung Galaxy A23 5G च्या टॉप मॉडेलमध्ये ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. त्याची किंमत २२,९९९ रुपये आहे. SBI, IDFC आणि ZestMoney वरून फोन खरेदी केल्यास २००० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच हा स्मार्टफोन सिल्वर, ऑरेंज और लाइट ब्ल्यू या कलरमध्ये उपलब्ध आहे. हा फोन सॅमसंगच्या वेबसाइटवरून आणि इतर साईटवरून १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खरेदी करता येणार आहे.

Galaxy A23 5G चा नॉक्स सिक्युरिटी सूट, चिप स्तरावर बनवला गेला आहे, ज्याच्याद्वारे 3.5 वर्षांच्या सिक्युरिटी पॅच अपडेट्ससह तुमचा डेटा, सुरक्षित हातात असल्याची खात्री केली जाते. हे चार वर्षांच्या अशा सुरक्षा अपडेटसह आणि दोन OS अपग्रेडसह उपलब्ध असणार आहे.