मेटा (फेसबुक) मालकीचे फोटो शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने युजर्ससाठी एक नवीन फीचर लॉंच केलंय. इन्स्टाग्रामवरील युजर्स आता आपल्या प्रोफाइलचा एम्बेड कोड इतर कोणत्याही वेबसाइटवर शेअर करू शकणार आहेत. साध्या शब्दात सांगायचं झालं तर इन्स्टाग्रामचे युजर्स कोणत्याही वेबसाइटवर आपली ओळख अपडेट करण्याऐवजी इन्स्टाग्राम प्रोफाइलची एम्बेड कोड अपडेट करू शकणार आहेत.

आणखी वाचा : Income Tax Return: ITR शी आधार कार्ड लिंक करणं अगदी सोपं, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया ?

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

आणखी वाचा : WhatsApp New Feature: आता प्रायव्हेट मेसेजेस लपवणं झालं सोपं, व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फीचर केलंय अपडेट

Instagram ने अलीकडेच Instagram Stories आणि Reels साठी प्लेबॅक फिचर लाँच केलं आहे. प्लेबॅक व्हिडिओमध्ये, युजर्सना वर्ष २०२१ मधील टॉप-10 स्टोरीज आणि पोस्टचा व्हिडीओ क्रिएट करता येणार आहे. हा व्हिडीओ एडीट देखील केला जाऊ शकतो. युजर्सकडे अशी सुविधा देखील आहे की ते २०२१ चे स्टोरीज पूर्णपणे हटवू शकतात आणि त्यानुसार फोटो-व्हिडीओ निवडून नवीन स्टोरी तयार करू शकतात.

इन्स्टाग्रामचे प्रोफाईल एम्बेडेड फीचर सध्या यूएसमध्ये उपलब्ध आहे, परंतु ते लवकरच इतर देशांमध्ये रिलीज केले जाईल. हे इन्स्टाग्रामवर क्रिएटर्सना मदतीचं ठरणार आहे. वेबसाइट किंवा इतर प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल एम्बेड कोड शेअर केल्यानंतर, त्या युजर्सच्या प्रोफाइलचं पूर्वावलोकन दाखवलं जाईल.

रील्स, व्हिज्युअल रिप्लाय फीचरद्वारे तुम्ही ६० सेकंदात पोस्टला आणि व्हिडीओला रिप्लाय देऊ शकता. आतापर्यंत रिप्लायसाठी फक्त टेक्स्ट ऑप्शन होता. नवीन अपडेटमध्ये तुम्ही स्टिकर्सद्वारेही रिप्लाय देऊ शकाल.