scorecardresearch

Premium

मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर Elon Musk चं मोठं विधान; म्हणाला, “ही माझी…”

एलॉन मस्क हे दुबईतील र्ल्ड गव्हर्नमेंट समिट (WGS) मध्ये बोलत होते.

elon musk and childrens news
Elon Musk (Image Credit- Reuters)

Elon Musk हे टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ आहेत. मस्क आपल्या अनेक निर्णयांमुळे कायम चर्चेत असतात. दोन दिवसांपुर्वी त्यांनी आपल्या कुत्र्याला ट्विटरचा नवीन सीईओ म्हणून घोषणा केली होती. एलॉन मस्क यांना एकूण ९ मुले आहेत. एलॉन मस्क यांनी एका कार्य्रक्रमात आपल्या मुलांच्या सोशल मीडियाच्या वापराबद्दल एक भाष्य केले आहे.

एलॉन मस्क हे दुबईतील र्ल्ड गव्हर्नमेंट समिट (WGS) मध्ये बोलत होते. यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे की, मी माझ्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला नाही कदाचित ही माझी चूक असेल. तसेच त्यांना वाटले की त्यांच्या मुलांना Reddit आणि YouTube द्वारे ‘प्रोग्रॅम’ करण्यात आले आहे. त्यामुळे ते काय पाहत आहेत यावर लक्ष ठेवणे मला आवडेल.

man kissed baby alligator viral video
तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”
Rohit Sharma angry video in IND vs ENG 3rd test in rajkot
IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
new india assurance recruitment 2024
नोकरीची संधी : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. मधील संधी
A woman saree stuck in the wheel of a two-wheeler a cleaning worker help them Uncle's humanity won everyone's heart Viral Video
दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

हेही वाचा : Google Layoffs: गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, सुंदर पिचाई म्हणाले…

एलॉन मस्क यांनी AI बद्दल देखील भाष्य केले. ते म्हणाले की, AI ही अशी एक गोष्ट आहे की ज्याबद्दल आपण काळजी घेणे आवश्यक आहे. जर यात काही गडबड होत असले तर AI संदर्भात काही नियम असले पाहिजेत. Chatgpt ने जगाला AI किती प्रगत झाले आहे हे दाखवले. ते म्हणाले, आम्हाला AI च्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल. चॅटजीपीटी दर्शवते की AI किती प्रगत झाले आहे. हे काही काळासाठी प्रगत करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Twitter ceo elon musk feels not restricting his childrens social media use his mistake tmb 01

First published on: 17-02-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×