scorecardresearch

ChatGpt Plus: चॅटबॉट वापरासाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे, जाणून घ्या

सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.

Chatgpt Plus new subscription news
Chatgpt Plus – (Image Credit-OpenAI)

ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. नवीन टेक स्टार्टअप OpenAI ने बुधवारी ChatGPT Plus ची घोषणा केली. AI चॅटबॉट चॅटजीपीटीसाठी पेड सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे. या नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅनमुळे वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगली आणि वेगवान सेवा मिळेल. AI चॅटबॉट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच लॉन्च करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याची सतत चर्चा सुरु आहे.

नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनेक फायदे

या नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅनसह कंपनीने चांगली आणिवेगवान सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या Microsoft सॉफ्टवेअरच्या उत्पादनांसाठी OpenAI च्या तंत्रज्ञानाचा अधिकृतपणे वापर केला जाईल. वकिलांपासून ते स्पीच रायटरपर्यंत , कोडरपासून पत्रकारांपर्यंत प्रत्येकजण ChatGPT ची वाट पाहत होता असे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा : ChatGpt वापरणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे; जाणून घ्या

किती असणार सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत ?

ChatGPT च्या पेड सब्स्क्रिप्शनसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला २० डॉलर म्हणजेच १,६०० रुपये भरावे लागणार आहेत. या आधी वापरकर्त्यांना चॅटबॉट चॅटजीपीटी वापरण्यासाठी $४२ म्हणजे सुमारे ३,४०० रुपये प्रति महिना भरावे लागतील असा दावा केला जात होता. मागच्या महिन्यात व्यावसायिक स्तरावर वापरासाठी कोणतेही पेड सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल अशी अट कंपनीची नव्हती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:13 IST
ताज्या बातम्या