विवो (Vivo) कंपनीने बहुप्रतीक्षित विवो व्ही ३० सीरिजची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये “विवो व्ही ३० आणि विवो व्ही ३० प्रो” (Vivo V30, V30 Pro) यांचा समावेश आहे. तर या दोन्ही सीरिज आज गुरुवारी ७ मार्च रोजी भारतात लाँच करण्यात आल्या आहेत. तर या लेखातून विवो व्ही ३० सीरिजच्या फोनची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

अंदमान ब्लू आणि क्लासिक ब्लॅक रंगांमध्ये ऑफर केलेला, Vivo V30 Pro भारतात ८ जीबी प्लस २५६ जीबी = ४१,९९९ रुपये, तर १२ जीबी प्लस ५१२ जीबी = ४६,९९९ रुपयांना उपलब्ध असेल.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

तर विवो व्ही ३० Andaman ब्लू, पीकॉक ग्रीन शेड व्यतिरिक्त क्लासिक ब्लॅक रंग पर्यायांमध्ये खालील तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.
८ जीबी प्लस १२८ जीबी = ३३,९९९ रुपये.
८ जीबी प्लस २५६ जीबी = ३५,९९९ रुपये.
१२ जीबी आणि ५१२ जीबी = ३७,९९९ रुपये.

विवो व्ही ३० आणि विवो व्ही ३० प्रो’ची फीचर्स :

दोन्ही सीरिजमध्ये ६.७८ इंच Curved १.५ के (2,800 x 1,260 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. यात १२० एचझेडरिफ्रेश रेट, ३०० एचझेड टच सॅम्पलिंग रेट (touch sampling rate) आणि २,८०० nits पीक ब्राइटनेस आहे. विवो व्ही ३० स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ एसओएससह येतो; तर विवो व्ही ३० प्रो मॉडेल MediaTek Dimensity ८२०० चिपसेटला सपोर्ट करतो. हँडसेट १२ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित FunTouchOS 14 सह परिपूर्ण आहेत.

कॅमेरा :

दोन्ही मॉडेल्समध्ये ५० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. विवो व्ही ३० मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि ऑरा लाइट फ्लॅश युनिटसह अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह दुसरा ५० मेगापिक्सेल सेन्सरचा कॅमेरा आहे. तर विवो व्ही ३० प्रोमध्ये ५० मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा आहे.

विवो व्ही ३० आणि विवो व्ही ३० प्रो या दोन्ही सीरिजवर ५,००० एमएएच बॅटरी पॅक दिल्या आहेत; ज्यात यूएसबी टाईप-सी पोर्टद्वारे ८० डब्ल्यू (80W) वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यामध्ये फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तर बेस व्हेरिएंट ब्लूटूथ ५.४ ला सपोर्ट करतो, तर प्रो मॉडेलला ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटी मिळते.

हेही वाचा…रिअलमीने भारतात लाँच केले ‘हे’ दोन जबरदस्त स्मार्टफोन्स; ग्राहकांना फीचर्ससह देणार खास ऑफर्स

ऑफर्स :

विवोच्या या दोन्ही सीरिज खरेदी करणाऱ्या ऑनलाइन ग्राहकांना एसबीआय किंवा एचडीएफसी कार्डांवर १० टक्के सूट आहे. तसेच सहा महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI, तर चार हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटसुद्धा मिळेल. स्टोअर्समधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दहा टक्के झटपट कॅशबॅक, आठ महिन्यांपर्यंत विना-किंमत EMI आणि Vivo च्या V-Shield योजनेवर ४० टक्के सूट मिळू शकते. ग्राहक १४ मार्चपासून फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि इतर ऑफलाइन रिटेल आउटलेट्सद्वारे फोन खरेदी करू शकणार आहेत. तसेच आज ७ मार्चपासून या मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग सुद्धा सुरू झाली आहे.