सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, ऑफिस कर्मचारी आदी अनेक जणांशी आपण संवाद साधतो. तसेच यातील काही खासगी चॅट्स सुरक्षित राहतील यासाठी सुरुवातीला युजर्स विविध कंपन्यांचे लॉक अ‍ॅप्स डाउनलोड करायचे. पण, आता व्हॉट्सअ‍ॅप लवकरच सगळ्या युजर्ससाठी एक खास फिचर घेऊन येणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये कोणत्याही दुसऱ्या कंपनीचा लॉक अ‍ॅप डाउनलोड करणे किंवा मोबइलच्या सेटिंगमध्ये जाऊन पासवर्ड टाकण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने काही महिन्यांपूर्वी एक ‘चॅट लॉक’ हे फिचर लाँच केले होते. त्यात तुम्ही युजरच्या चॅटमध्ये जाऊन ‘लॉक दिस चॅट विथ फिंगरप्रिंट’ असे मजकूर लिहिलेल्या बटणावर क्लिक करून चॅट लॉक करून ही चॅट तुम्हाला लॉक चॅट या लिस्टमध्ये दिसून यायची.

तर आता व्हॉट्सअ‍ॅप एक आणखीन नवीन फिचर घेऊन येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच सगळ्या युजर्ससाठी नवीन ‘सिक्रेट कोड फिचर’ (Secret Code feature) घेऊन येणार आहे. तुम्हाला माहिती असलेल्या पासवर्डसह तुम्ही चॅट लॉक करू शकणार आहात. तुम्ही वर्ड्स आणि इमोजीसह एक पासवर्ड तयार करू शकणार आहात आणि हा पासवर्ड फक्त तुम्हालाच माहीत असणार आहे. तसेच तुम्ही ‘सिक्रेट कोड’ सर्च बारमध्ये टाईप करून तुमच्या लॉक चॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी सेटिंगदेखील सेट करू शकता. या नवीन फिचरची माहिती कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana samosa seller convince to ladies to buy samosa
“लाडक्या बहिणीचे तीन हजार आले, घ्या वीसचे चार समोसे” ट्रेनमधल्या विक्रेत्याचा VIDEO व्हायरल; शेवट पाहून पोट धरुन हसाल
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर
KL Rahul Retirement Viral Instagram Story Fact Check
KL Rahul: केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती? काय आहे व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीमागचं सत्य
move your chats photos from Android to iPhone
Android वरून iPhone वर चॅट्स, फोटो कसे ट्रान्सफर करायचे? फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा
Imane Khelif transformation Video Goes viral after Paris Olympics gender row
Imane Khelif: इमेन खलिफच्या मेकओव्हरचा VIDEO व्हायरल, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या इमेनचा ग्लॅमरस लुक पाहून सर्वच झाले अवाक्
Gautam Gambhir statement on foreign coach video viral
‘परदेशी प्रशिक्षक फक्त पैसे कमवण्यासाठी येतात…’, मॉर्ने मॉर्केलला बॉलिंग कोच नियुक्त केल्यानंतर गौतम गंभीरचा VIDEO व्हायरल
Virat Kohli video viral
Virat Kohli in Olympics : ऑलिम्पिक २०२४ संपण्यापूर्वी विराटची का होतेय चर्चा? ‘या’ व्हायरल व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

नवीन फिचरचा उपयोग करून चॅट कसे लॉक कराल ?

व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे की, चॅट लॉक करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक युजरच्या चॅट सेटिंगमध्ये जावे लागणार नाही. कारण आता तुम्हाला चॅट लॉक करण्यासाठी लाँग प्रेस करून सहज चॅट लॉक करता येईल.

हेही वाचा…भारत सरकारने ‘एवढे’ मोबाईल नंबर केले डिस्कनेक्ट! जाणून घ्या तुमचे नंबर सुरक्षित ठेवण्याचे ‘हे’ उपाय…

नवीन व्हॉट्सअ‍ॅप सिक्रेट कोड फिचरमध्ये अ‍ॅक्सेस कसा करायचा?

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्या चॅट्स खासगी ठेवण्यासाठी, तुम्ही लॉक केलेल्या चॅट्सची लिस्ट उघडा. तिथे तुम्हाला सगळ्यात वरती तीन डॉट दिसतील, तिथे तुम्ही क्लिक करा. यानंतर, चॅट लॉक सेटिंग्जवर जा आणि हाईड लॉक चॅट ऑन करा आणि सिक्रेट कोड सेट करा, जो तुमच्या लक्षात राहील. यानंतर तुम्हाला लॉक केलेल्या चॅट मुख्य चॅटमध्ये दिसणार नाही, जिथे सर्व युजर्सच्या चॅट दिसतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट स्क्रीनवर खाली स्वाईप करताना तुम्हाला लॉक केलेल्या चॅट्सचा शॉर्टकट दाखवते किंवा तुम्हाला तुमच्या लॉक केलेल्या चॅट्स पाहायच्या असल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्च बारमध्ये तुमचा सिक्रेट कोडसुद्धा टाकू शकता.