WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधत असतो. यावर आपल्याला व्हिडीओ कॉल्स, व्हॉइस कॉल्स आणि अनेक गोष्टी करता येतात. याची मूळ कंपनी ही meta आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन फिचर रोलआऊट केले आहे. तर ते फिचर कोणते आहे आणि त्याचा कसा फायदा वापरकर्त्यांना होणार आहे हे जाणून घेऊयात.

WhatsApp ने आतापर्यंत वापरकर्त्यांसांठी अनेक फीचर्स आणि अपडेट्स लॉन्च केली आहेत. आता लवकरच त्यामध्ये आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. ‘Side By Side’ असे त्या फीचरचे नाव आहे. या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या फीचरमुळे वापरकर्ते कोणत्या अडचणींशिवाय एका चॅटमधून दुसऱ्या चॅटमध्ये स्विच करू शकणार आहेत. यामुळे तुम्ही करत असलेल्या चॅट्समधून बाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे चॅट्स अधिक योग्य पद्धतीने कंट्रोल करू शकणार आहेत.

RBI orders banks to refund excess interest charged to customers
वसूल केलेले जास्तीचे व्याज ग्राहकांना परत करण्याचे बँकांना आदेश; रिझर्व्ह बँकेचा व्याज वसुलीच्या बँकांतील कुप्रथांवर प्रहार
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

हेही वाचा : Vodafone-Idea युजर्सना मोठा धक्का! सहा महिन्यांची वैधता असणारा ‘हा’ जबरदस्त प्लॅन केला बंद

काय आहे Side by side हे फीचर ?

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर Android टॅबलेट वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. हा नवीन मोड वापरकर्त्यांना त्यांच्या WhatsApp इंटरफेसची स्क्रीन स्प्लिट करण्याचा पर्याय देईल. या फीचरमध्ये वापरकर्ते एकाच वेळी दोन किंवा अधिक ठिकाणी चॅट्स करू शकणार आहेत. मात्र या फीचरमध्ये वापरकर्त्यांना चॅटिंगसाठी थोडी जागा कमी मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना हे फिचर नको असल्यास WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन हे फिचर डिसेबल करू शकतील.

हेही वाचा : आता Earphones नसले तर ‘या’ बसमध्ये NO ENTRY, जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं; जाणून घ्या नेमका काय आहे नियम?

मोठ्या इंटरफेसवर संभाषण करण्यासाठी WhatsApp वापरकर्ते त्यांच्या अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे वैशिष्ट्य डिसेबल करू शकतात. यासाठी वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जावे लागेल. यानंतर चॅट्समध्ये जाऊन तेथे साइड-बाय-साइड या फीचरचा पर्याय डिसेबल करा. हे फिचर सध्या काही बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे