Windows Pc Not Connecting Wifi : विंडोज पीसी वापरताना तो वायफायशी कनेक्ट न होण्याची समस्या तुम्ही अनुभवत असाल तर चिंता करण्याचे कारण नाही. काही उपयांद्वारे तुम्ही ही समस्या सोडवू शकता. विंडोज पीसीवर वायफायशी कनेक्ट होताना अनेबल टू कनेक्ट, एरर किंवा कनेक्ट करताना सर्व प्रक्रिया अडकून राहण्याची समस्या युजर्सना होते. तसेच, वायफाय चालू न होणे किंवा वायफाय नेटवर्क सर्च न होणे, या समस्या होतात. त्या कशा सोडवायचा जाणून घेऊया.

(कुणालाही दिसणार नाही हा Folder, खाजगी फाइल्स ठेवण्यासाठी उत्तम, ‘असे’ तयार करा)

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

वायफायशी कनेक्ट न होण्याची कारणे आणि उपाय

  • सर्वात आधी वायफाय व्यवस्थित काम करत आहे की नाही हे तपासा. अशीही परिस्थिती असते ज्यात वायफाय बंद असताना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून एकदा वायफाय चालू आणि बंद करा आणि नंतर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.
  • तुमचे वायफाय नेटवर्क व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे तपासा. तुमचा फोन वायफाय नेटवर्कशी कनेक्ट होते की नाही हे तपासा.
  • वायफाय ड्रायव्हर कदाचित खराब असेल. वायफाय ड्रायव्हर योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासा. यासाठी पीसीवर राइट क्लिक करून डिव्हाइस मॅनेजरवर क्लिक करा. येथे वायफाय ड्रायव्हरवर शोधा आणि त्यावर राइट क्लिक करून त्यास अपडेट करा. तुम्ही विंडोज अपडेट देखील करू शकता.
  • वायफाय ड्रायव्हर अनइन्स्टॉल आणि रिइन्स्टॉल करा. जर तुमचे वायफाय ड्रायव्हर काम करत नसेल आणि अपडेट केल्यानंतर ते चालू होत नसेल तर आधी त्यास अनइन्स्टॉल करा आणि नंतर पीसी रिस्टार्ट करा, त्यानंतर पुन्हा रिइन्स्टॉल करा.
  • वायफाय नेटवर्क बँड हे लॅपटॉप किंवा पीसीसोबत सुसंगत आहे की नाही हे तपासा. काही जुन्या उपकरणांमध्ये ५ गिगाहर्ट्झ नेटवर्क सपोर्ट करत नाही. लॅपटॉप २.४ गिगाहर्ट्झ नेटवर्कशी कनेक्ट करून बघा, ते अनेक डिव्हाइसेसशी सुसंगत होते.
  • नेटवर्क डायग्नोस्टिक टूल सुरू करा. विंडोजमध्ये ट्रबल शुटिंग फीचर असते जे समस्या आपोआप सोडवण्यासाठी मदत करते. नेटवर्क डायग्नोस्टिक सुरू करण्यासाठी स्टार्टमध्ये सेटिग्स नंतर नेटवर्क आणि इंटरनेट, नंतर स्टॅटस त्यात अडव्हान्स नेटवर्क सेटिंग, त्यात नेटवर्क ट्रबलशुटर पर्याय निवडा आणि वायफाय समस्या टाळण्यासाठी सूचनांचे पालन करा.
  • तुमच्या राऊटरचे सेटिंग बरोबर आहे की नाही हे तपासा. सर्व्हिस प्रोव्हाइडरशी संपर्क साधा.

(‘Samsung’ची नवीन ऑफर ऐकली का? टीव्हीवर मोफत मिळणार Galaxy Smartphone, जाणून घ्या सविस्तर)

वरील सर्व उपाय करूनही जर लॅपटॉप किंवा पीसी वायफायला कनेक्ट होत नसेल तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपच्या वायफाय अडाप्टरमध्ये काही समस्या असेल. अशावेळी सर्व्हिस सेंटर जाऊन त्याची तपासणी करून घ्या.