scorecardresearch

आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही बुक करू शकता Uber Cab, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Book Uber Ride Via Whatsapp : उबेर युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया.

आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही बुक करू शकता Uber Cab, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
(pic credit – indian express/financial express/loksatta gfx)

Book Uber Ride Via Whatsapp : उबेर, ओला आणि इतर कॅब कंपन्यांमुळे लोकांना प्रवासासाठी टॅक्सी मिळणे सोपे झाले आहे. या कंपन्यांच्या अ‍ॅपवरून कॅब बुक करता येते. त्यामुळे, ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठीची धडपड कमी झाली असून लोकांना त्यांच्या घरासमोर प्रवासासाठी वाहन मिळत आहे. यात कॅब बुक करण्यासाठी उबेरने आणखी एक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. उबेर युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया.

उबेरने या वर्षीच्या सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे युजरला कॅब बुक करता यावी यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सोबत भागीदारी केली आहे. ही सेवा सध्या दिल्ली एनसीआर आणि लखनऊ भागात सुरू आहे. या भागातील युजर्स एका मोबाईल क्रमांकावर मेसेज करून कॅब बूक करू शकतात. या शिवाय व्हॉट्सअ‍ॅप वारकर्ते त्यांच्या राइड्स व्यवस्थापित करू शकतील आणि प्रवासाची पावती मिळवू शकतील. युजर्स इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषा वापरून राइड बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब बुक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

Flashback 2022 : २०२२ मध्ये ‘या’ 5 गॅजेट्सनी घेतला ग्राहकांचा निरोप, फीचर्समुळे राहिले चर्चेत

  • व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर राइड बुक करण्यासाठी स्मार्टफोनच्या संपर्क यादीमध्ये +91 7292000002 सेव्ह करा.
  • सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअमध्ये उबेर चॅटबॉटसोबत नवीन चॅट सुरू करा. तुम्ही http://wa.me/917292000002 द्वारेही चॅट करू शकता.
  • चॅटमध्ये Hi सेंड करा आणि आता तुम्हाला ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे आणि ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचा पत्ता पाठवा. पिकअपसाठी तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशनदेखील शेअर करू शकता.
  • तुम्हाला उबेरकडून अपेक्षित भाडे आणि इतर तपशील प्राप्त होईल.
  • आता तुम्हाला भाडे आणि राइड निश्चित करणे आवश्यक आहे.
  • जवळपासच्या चालकाने तुमची राइड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर उबेर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 10:28 IST

संबंधित बातम्या