News Flash

१३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ‘झेनफोन सेल्फी’ दाखल

तैवानस्थित 'आसुस' कंपनीचा बहुप्रतिक्षीत 'झेनफोन सेल्फी' या स्मार्टफोनचे अनावरण तैवानमध्ये सुरू असलेल्या कॉम्युटेक्स २०१५ मध्ये करण्यात आले.

| June 1, 2015 03:55 am

तैवानस्थित ‘आसुस’ कंपनीचा बहुप्रतिक्षीत ‘झेनफोन सेल्फी’ या स्मार्टफोनचे अनावरण तैवानमध्ये सुरू असलेल्या कॉम्युटेक्स २०१५ मध्ये करण्यात आले.  सेल्फीची वाढती लोकप्रियता पाहता स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा जास्त मेगापिक्सचा असावा या संकल्पनेतून ‘झेनफोन सेल्फी’ या स्मार्टफोनला तब्बल १३ मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ५.५  इंचाच्या स्क्रीनचा ‘झेनफोन सेल्फी’ स्मार्टफोन अँड्रॉईडच्या अद्ययावत ५.० लॉलीपॉप प्रणालीवर चालतो. स्क्रीनला पडणाऱया ओरखड्यांपासून बचावासाठी झेनफोन सेल्फीच्या स्क्रीनला गोरीला ग्लासचे आवरण देण्यात आले आहे. रॅमच्या बाबतीत २ आणि ३ जीबी अशा दोन पर्यायांमध्ये झेनफोन सेल्फी उपलब्ध होणार आहे. मात्र मोबाईलचा १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा याच वैशिष्ट्यामुळे झेनफोन सेल्फी इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा ठरतो. सेल्फीप्रियजनांसाठी पर्वणी ठरणारा या ‘झेनफोन सेल्फी’ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 3:55 am

Web Title: asus zenfone selfie with 13 megapixel front rear camera launched
Next Stories
1 स्वस्तातले ‘लॉलिपॉप’
2 महागडी हौस
3 हे कसे बनते? जाणून घ्यायचंय?
Just Now!
X