गेली वर्षी नोव्हेंबर महिन्यात गॅजेटच्या तमाम चाहत्यांना आणि माध्यमांना उत्सुकता होती ती अ‍ॅपलच्या एका नव्या गॅजेटबद्दल, ज्याचं नाव आहे अ‍ॅपल वॉच. नोव्हेंबर महिन्यात अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी ते लॉंच केलं पण त्याची उत्सुकता अद्याप कमी झालेली नाही. कारण या बहुचíचत गॅजेटची बुकिंगच मुळात सुरू झाली ती या वर्षी १० एप्रिलपासून आणि २४ एप्रिलपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध झाले, पण फक्त नऊ देशांत. यात अमेरिका, चीन, जपान, हाँगकाँग, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. यामुळे भारतीयांना या वॉचसाठी जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण दोन महिने हा हा म्हणता निघून जातील. त्यामुळे आत्तापासूनच हे गॅजेट कसे वापरायचे याची माहिती करून घ्यायला काय हरकत आहे?
*‘अ‍ॅपल वॉच’ वापरण्याआधी तुमच्या आयफोनचे सॉफ्टवेअर ‘आयओएस ८.२’ पर्यंत अपडेट करणं अतियश गरजेचं आहे. तसेच तुमच्या अ‍ॅपल आयडी आकाऊंटचा पासवर्ड तुमच्याकडे असायला हवा.
* सर्वात आधी ‘अ‍ॅपल वॉच’वर तुमची भाषा सेट करा आणि त्यानंतर तुमच्या आयफोनवर ‘अ‍ॅपल वॉच’ अ‍ॅप सुरू करा. त्यानंतर दोन्ही डिव्हाईसवर म्हणजे ‘अ‍ॅपल वॉच’ आणि आयफोनवर स्टार्ट पेअरिंग या पर्यायावर क्लिक करा.
* इथे खरी धमाल सुरू होणार आहे. तुमचा आयफोन कॅमेरा सुरू करून त्यामध्ये घडय़ाळात सुरू असलेल्या अ‍ॅनिमेशनचा फोटो काढून घ्या, ज्यामध्ये एम्बेड कोड आहे त्यामुळे तुमच्या फोनला कळेल की तुमच्याच घडय़ाळासोबत पेअरिंग करायचे आहे किंवा कनेक्ट करायचे आहे. आयफोनच्या अ‍ॅपमध्ये असलेल्या स्टेप्स फॉलो करा. त्यानंतर तुमच्या फोनवर घडय़ाळाचे अ‍ॅप व्हर्जन घेण्यासाठी ‘इन्स्टॉल ऑल’ ह्या पर्यायावर क्लिक करा.   
* सर्व माय अ‍ॅप, संपर्क क्रमांक आणि कॅलेंडरच्या एन्ट्रीज सिंक होण्यासाठी साधारण १२ मिनिटे लागतील. या वेळेत तुम्ही तुमच्या फोनवर टय़ुटोरिअलचा व्हिडीओ पाहू शकता.
* तुम्ही तुमच्या आयफोनच्या अ‍ॅपमधील माय वॉचमध्ये जाऊन घडय़ाळाच्या सेटिंग्समध्ये बदल करू शकता. पण सुरुवातीलाच त्यावर खूप वेळ खर्च करू नका. तुमच्या लाईफस्टाइलमध्ये हे नवीन घडय़ाळ कसे फिट होते याचा काही दिवस अंदाज घ्या. सुरुवातीला फोनवर असलेल्या गोष्टींसोबत घडय़ाळाचे नोटिफिकेशन्स जुळतील. पण ते तुम्हाला फारच त्रासदायक वाटायला लागलं तर त्यातील घडय़ाळावर नको असलेले नोटिफिकेशन्स केवळ फोनवरच दिसतील असा बदल तुम्ही सेटिंगमध्ये करू शकता.
* ई-मेलसाठी तुम्ही काही महत्त्वाचे ई-मेल आयडी व्हीआयपी लिस्टमध्ये टाकून त्यांचेच मेसेजेस तुमच्या घडय़ाळामध्ये दिसतील अशी व्यवस्था करू शकता.      
* तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि गाणीही यावर ऐकता येतील. तुम्हाला जे फोटो पाहायचे आहेत किंवा जी गाणी ऐकायची आहेत ती तुमच्या फोनअ‍ॅपमध्ये जाऊन सिंक करा.  
* फोनवर ‘पासबुक आणि अ‍ॅपल पे’मध्ये जाऊन मोबाइल पेमेंट हा पर्याय सुरू केल्यास ‘अ‍ॅपल वॉच’चा वापर रिटेल स्टोरमध्येही करता येणार आहे.
* फोनमधील अ‍ॅपल स्टोरच्या ‘अ‍ॅपल वॉच अ‍ॅप’मधून तुम्हाला नवीन अ‍ॅप्सही घडय़ाळामध्ये टाकता येतील.

मोशन कन्ट्रोल
अ‍ॅपल वॉच तुमच्या आयफोनशी कनेक्ट असल्यामुळे फोनच्या हालचाली घडय़ाळाकडून आपोआप आत्मसात केल्या जातात. घडय़ाळाच्या छोटय़ा स्क्रीनमुळे ते नेहमीच शक्य होईल असे नाही. अ‍ॅपल वॉच आणि आयफोनमध्ये टय़ुनिंग व्हायला थोडा वेळही जाईल.

इन अँड आऊट
* घडय़ाळाचं होम पेज आणि मेन्यू अ‍ॅप यामध्ये सहज येण्याजाण्यासाठी घडय़ाळाची डायल हळूच प्रेस करा, ज्याला डिजिटल क्राऊन असं म्हणतात. तुम्ही एखाद्या अ‍ॅपमधून बाहेर पडताना जे मोबाइलवर करता, त्यातलाच हा प्रकार.
* नुकतंच वापरलेल्या अ‍ॅपमध्ये पुन्हा जायचं असेल तर सौम्यपणे दोनदा प्रेस करा. पण अतिशय जोरात प्रेस केलात तर तो तुम्हाला ‘अ‍ॅपल व्हॉईस असिस्टंट’कडे म्हणजेच ‘सिरी’कडे घेऊन जाईल. झूम, स्क्रोल किंवा एका मेन्यूमधून दुसऱ्या मेन्यूमध्ये जाण्यासाठी डायल फिरवावी लागेल. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे, फिरवणे म्हणजे नळ फिरवण्यासारखं नाही तर आपण ज्याप्रमाणे पण खेळण्यातल्या गाडीचे चाक आपल्या बोटाने हळुवारपणे फिरवतो तो हळुवारपणा येथे अपेक्षित आहे.  
* वॉचवरील दुसरे बटण तुम्हाला मित्रांशी संपर्क साधण्यासाठी आहे. तुमच्या आयफोन वॉच अपमध्ये फ्रेंड्स या पर्यायाखाली जे संपर्क क्रमांक सेव्ह आणि फेव्हरिट कराल ते तुम्हाला येथे दिसतील, तुम्ही त्यांना फोन आणि मेसेज करू शकता.
* तुमच्या मित्रांकडेही आयफोन अ‍ॅपल वॉच असेल तर तुम्ही त्यांना डुडल आणि व्हायब्रेशन्सहीपाठवू शकता.
* याच बटनाचा दोनदा क्लिक केल्यावर त्याचा उपयोग ‘अ‍ॅपल पे’चा रिटेल स्टोरमध्ये वापर करण्यासाठी होऊ शकतो.
* स्क्रीनवर नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी खाली स्वाईप करावे लागेल. वरच्या बाजूला स्वाईप केलात काही महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात कळू शकतील. – म्हणजेच हवामान, कॅलेंडर आणि स्टॉक्स. अशाच प्रकारे उजवीकडे आणि डावीकडे स्वाईप केलात तर मेन्यूमधील विविध पर्यायांवर जाऊ शकाल. स्क्रीनवर स्वाईप करत शेवटच्या डाव्या कोपऱ्यावर आलात तर तुम्हाला सेटिंग हा पर्याय दिसेल.
* स्क्रीनवरील आयकन आणि बटनासाठी बोटाचा वापर अतिशय हळुवारपणे करा. तुम्ही खूप जोरात स्क्रीनवर प्रेस केलात तर इतर फंक्शन्स अक्टिव्हेट होण्याची शक्यता आहे. शेवटी हा सवयीचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही एकदा त्याचा वापर करायला लागलात की त्यातील बारीकसारीक गोष्टी तुम्हाला लक्षात येतील.  
* स्क्रीनशॉट घेण्यासाठी दोन्ही बाजूची बटने एकत्रित आणि हळुवारपणे दाबा, त्याशिवाय ते काम करणार नाही. हा स्क्रीनशॉट तुम्हाला तुमच्या आयफोनमधील फोटो अ‍ॅपमध्ये पाहायला मिळेल.   

रीडाइंग अ‍ॅप
* हे अ‍ॅप तुमच्या अक्टिव्हिटीजसाठी आहे. प्रॉम्प्ट्समध्ये तुम्हाला याची सर्व माहिती मिळू शकेल. उदा. तुम्ही खूप वेळ एकाच जागी बसला असाल तर हे अ‍ॅप तुम्हाला त्याची आठवण करून देईल.
* वर्कआऊट करत असताना ‘अ‍ॅपल वॉच’ तुमच्या फोनवरील जीपीएस सेंसरचा वापर करून अंतर मोजते. फोनशिवायही ‘अ‍ॅपल वॉच’ तुमच्या पावलांची गती मोजते, परंतु ती चुकीची असू शकेल. परंतु, तुम्ही तुमच्या फोनसोबत काही दिवस चाललात किंवा धावलात तर ऑफलाइन असतानाही ‘अ‍ॅपल वॉच’ ती अचूकता आणू शकेल.  

टॅटय़ूची अडचण
एक वाईट बातमी अशी की तुमच्या मनगावर तुम्ही जिथे ‘अ‍ॅपल वॉच’ बांधणार आहात त्या जागी जर एखादा टॅटय़ू तुम्ही कोरून घेतला असेल तर तो तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. अ‍ॅपलने अधिकृतरीत्या हे जाहीरही केलं आहे. तुमच्या त्वचेवरील एखादा कायमस्वरूपी किंवा तात्पुरता बदल, म्हणजेच टॅटय़ू तुमच्या हार्ट रेट सेंसरच्या परफॉर्मन्समध्ये बाधा आणू शकतो. शाई किंवा संपूर्ण नष्ट न झालेल्या रंगामुळे सेंसरच्या किरणांमध्ये अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे शरारातील बारीकसारीक गोष्टींचे वाचन करता येणार नाही.

अधिक मदत हवी आहे?
कुठल्याही अपॉइंटमेंटशिवाय अ‍ॅपल स्टोरला भेट द्या. तसेच व्हिडीओ टय़ुटोरिअलशिवाय, फ्री व्हिडीओ चॅट ऑनलाइनचीही सुविधा अ‍ॅपलने उपलब्ध करून दिली आहे.   
– प्रशांत ननावरे
prashant.nanaware@expressindia.com