News Flash

टॅब आणि नोटबूकही

तुम्ही कमी वजनाचा नोटबूक घ्यायचा की मोठा टॅब घ्यायचा अशा विचारात असाल तर तुमचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा.

| January 2, 2015 12:55 pm

tec07तुम्ही कमी वजनाचा नोटबूक घ्यायचा की मोठा टॅब घ्यायचा अशा विचारात असाल तर तुमचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा. आयबॉलने गेल्या वर्षांच्या अखेरीस बाजारात आणलेला आयबॉल स्लाइड डब्ल्यू क्यू १४९ हा टू इन वन टॅब तुमची दोन्ही गरज पूर्ण करू शकतो. यामुळे तुम्हाला टॅब किंवा नोटबूक वेगवेगळे घेण्याची गरज भासणार नाही. आयबॉलचे हे वेगळे इनोव्हेशन असून यामध्ये त्यांनी टॅब की नोटबूक या दोन्हीमध्ये गोंधळलेल्या वापरकर्त्यांना चांगला पर्याय दिला आहे. आयबॉलचा हा पर्याय तांत्रिक दृष्टय़ा कसा आहे हे पाहुयात.
डिस्प्ले – आयबॉलच्या टॅबला एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन १०.१ इंचांची असून १२८० बाय ८०० पिक्सेलचा आहे. याचबरोबर त्याला आयपीएस टच देण्यात आला आहे. यामुळे डिस्प्ले आणि टचच्या बाबतीत हा टॅब सरस ठरतो.
डिझाइन – आयबॉल स्लाइड डब्ल्यू क्यू१४९ दोन भागांमध्ये विभागाला गेला आहे. याचा पहिला भाग म्हणजे हा एक टॅबलेट म्हणून वापरता येऊ शकतो. तर दुसरा भाग म्हणजे हा टॅबलेट सोबत दिलेल्या कीबोर्डच्या कव्हरला जोडला तर तो नोटबूक म्हणूनही वापरता येऊ शकतो. टॅबलेट म्हणून वापतरताना सध्या बाजारात असलेल्या टॅबलेट्सपेक्षा काही वेगळे दिसून आले नाही. पण ज्यावेळेस आपण हा टॅब कव्हरला जोडतो आणि नोटबूक म्हणून वापरतो तेव्हा एखाद्या छोटय़ा लॅपटॉपसारखा लूक येतो. लॅपटॉपसारख्या लूकमध्ये यामध्ये चांगलील स्पेसिंग देण्यात आली आहे. यामुळे हाताळतानाही तो खूप सोपा जातो.
ऑपरेटिंग सिस्टिम – या टॅबमध्ये विंडोज ८.१ ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यामुळे विंडोजची अद्ययात अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर्स आपल्याला वापरता येणे शक्य होणार आहे.
हार्डवेअर – यामध्ये इंटेल अटोमचा १.८३ गीगाहार्टझचा झेड३७३५डी प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये दोन जीबी डीडीआर३ रॅम देण्यात आला आहे. तर ३१.८डब्ल्यूएचची पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.
साठवण क्षमता – या फोनमध्ये ३२ जीबी अंतर्गत साठवण क्षमता देण्यात आली आहे. तर ही क्षमता एसडी कार्डच्या साहय्यााने ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ  शकते. या टॅब एक टीबीपर्यंतचे क्लाऊड स्टोअरजी उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्थात क्लाऊड स्टोअरेजसाठी काही दर आकारले जातात.
कॅमेरा – या टॅबमध्ये मुख्य कॅमरा पाच मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे तर फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. कॅमेराचा दर्जा चांगला असून हा कॅमेरा किमान आठ मेगापिक्सेलचा देता येणे शक्य आहे.
जोडणी – या टॅबला थ्रीजी डेटा, ब्ल्यूटय़ूथ ४.०, वाय-फाय ८०२.११ या जोडणी उपलब्ध आहेत.
की बोर्ड – या टॅबच्या कव्हरसोबत एक कीबोर्ड देण्यात आला आहे. हा कीबोर्ड आकाराने लहान असला तरी याची रचना चांगली आहे. यामध्ये टायपिंग करताना हात ठेवण्यासाठी पुरेशी जागाही देण्यात आली आहे. तसेच माऊसपॅडही वेगळे देण्यात आल्यामुळे अनेक छोटय़ा लॅपटॉपला असेलेला बॉल माऊस वापरण्याची गरज याला पडणार नाही. दोन की मधील अंतर पुरेसे असून प्रत्येक की स्वतंत्र आहे. यामुळे टाइपकरताना आजुबाजूची की दाबली जाण्याची शक्यता कमी आहे. कीबोर्ड आणि टॅब या दोन्ही गोष्टी एकाच कव्हरमध्ये मावतात याचबरोबर कव्हरच्या मागच्या बाजूस देण्यात आलेल्या चुंबकीय पट्टय़ांमुळे टॅबलेटला स्टँड मिळतो आणि टॅबचा लूब लॅपटॉपसारखा होता.
परफॉर्मन्स – या टॅब किंवा नोटबुकचा परफॉर्मन्स कार्यालयीन कामासाठी चांगला ठरतो. डॉक्युमेंट तयार करणे, वेब सर्फिग तसेच विविध अ‍ॅप्सच्या माध्यमतून काम करण्यसाठी हा टॅब, नोटबूक उपयुक्त ठरू शकतो. पण यामध्ये देण्यात आलेला प्रोसेसर या सर्व कामांसाठी तुलनेत कमी ठरतो. यामुळे अनेकदा काम करताना तुम्हाला सावकाश करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये तुम्ही जर मल्टिमीडिया फाइल्स वापरायच्या असतील तर हा टॅब अगदी धीमा होतो. टॅबसोबत ऑफिस ३६५ हे सॉफ्टवेअर एक वर्षांसाठी मोफत वापरावयास मिळणार आहे.
शेरा – आयबॉल स्लाइड डब्ल्यू क्यू १४९ दर्जा आणि किंमत पाहता मोबाइल, टॅब याचबरोबर डॉक्युमेंटेशनच्या कामासाठी उपयुक्त ठरू शकतो. यामुळे तुमच्या वजन असलेल्या लॅपटॉपच्या ऐवजी प्रवासासत छोटी-मोठी कामे करण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
किंमत – २४,९९९ रुपये आहे. मात्र विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर या किंमतीत फरक होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:55 pm

Web Title: tab and notebook
टॅग : Tab,Tech It
Next Stories
1 Tech नॉलेज : ऑनलाइन व्यवहारामध्ये कोड का टाकावा लागतो?
2 बाजार थंड पण चुरस कायम
3 संगणकीय गेम्स
Just Now!
X