प्रश्न – संगणकावर आणि मोबाइलवर मराठी टायपिंग कसे करायचे. तसेच युनिकोड म्हणजे काय?       – शुभांगी तांबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर – युनिकोड म्हणजे विविध प्रादेषिक भाषांसाठीच्या फॉण्ट आणि कळफलकाची सर्वमान्य प्रणाली. यामध्ये मराठीसह विविध देशांतील काही शे भाषांचा समावेश आहे. संगणकावर युनिकोड इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन ‘रिजनल अ‍ॅण्ड लँग्वेज’ हा पर्याय स्वीकारा. यामध्ये लँग्वेजेस हा पर्याय स्वीकारा. त्यातील पहिल्या पर्यायासमोर अ‍ॅड असा पर्याय असेल तो निवडा. त्यानंतर पुन्हा अ‍ॅड असे म्हणा. मग तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना संगणकात आलेल्या विविध भाषांचे पर्याय दिसतील. यामध्ये मराठीचा पर्याय असेल तो निवडा. यानंतर की-बोर्ड निवडा. मग ओके म्हणा. यानंतर तुम्हाला खालच्या टूलबारमध्ये उजव्या बाजूला ‘ईएन’ अशी इंगजी आद्याक्षरे दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता. मग तुमचा संगणक मराठी होतो. म्हणजेच त्यामध्ये आपण युनिकोडच्या मदतीने मराठी टाइप करू शकतो. हे मराठी टाइप करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट हा कळफलक शिकावा लागेल. जर तुम्हाला इंग्रजीतून मराठी टाइप करावयाचे असेल तर त्यासाठी गुगल इनपुटसारखे पर्याय तुम्ही संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता. ते केल्यावरही तुम्ही वरीलप्रमाणे सेटिंग करून कळफलक निवडला की तुम्हाला तो पर्याय खालच्या टूलबारमध्ये उपलब्ध होतो. मोबाइलवर मराठी टाइप करण्यासाठी विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युनिकोडमध्येच म्हणजे मंगल फॉण्टमध्ये टायपिंग होत असल्यामुळे तो कुणालाही कुठेही वाचता येऊ शकतो.

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to learn marathi typing
First published on: 22-12-2015 at 04:48 IST