१. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सहकाऱ्यांसोबत संवाद

जर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत एकसारखी गोष्ट वारंवार शेअर करावी लागत असेल, तर प्रत्येकाला प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे मेल करण्याची किंवा स्वतंत्रपणे सिलेक्ट करण्याची गरज नाही. तुम्ही सहकाऱ्यांचा एक मेल ग्रुप तयार करू शकता. यातून तुम्ही तुमच्या कामाचं वेळापत्रक, ड्राईव्हवरील डॉक्युमेंट्स असं सर्व काही शेअर करू शकता.

२. सहकाऱ्यांचा किंवा मित्रांसोबतचा वेळ जुळून आणण्यासाठी गुगल कॅलेंडरचा वापर

अनेकदा काही कामाचं नियोजन करायचं असतं किंवा अगदी सहजच एकत्र फिरायला जाण्याचंही नियोजन होतं. मात्र, सर्वांना सोयीची एक वेळ ठरवणं अवघड होऊन बसतं. कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कामांच्या तारखा ठरलेल्या असतात. अशावेळी गुगल कॅलेंडर तुम्हाला मदतीचा हात देऊ शकतं. सर्व सहकारी/मित्रांचे गुगल कॅलेंडर एकाचवेळी पाहून तुम्हा सर्वांना सोयीचा मोकळा वेळ सहजपणे शोधता येतो.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

३. कोणत्याही कामाबाबत सहकाऱ्यांशी चुटकीसरशी बोला

तुम्ही आणि तुमचे सहकारी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी तुम्हाला एकमेकांसोबत कोणत्याही प्रकल्पाबाबत वेगवेगळे विचार शेअर करता येतील. यासाठी तुम्ही जीमेल चॅट बॉक्सचा वापर करू शकता.

४. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, फाईन सुरक्षितपणे सहकाऱ्यांसोबत शेअर करा

एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल आणि एकमेकांचे महत्त्वाचे फाईल आपोआप एकमेकांना उपलब्ध व्हावेत असं वाटत असेल तर तुम्ही गुगल ड्राईव्हमधील फोल्डरचा प्रभावी वापर करू शकता. यात तुम्ही तुमच्या प्रकल्पाच्या नावाने फोल्डर तयार करून त्याचा एक्सेस सर्व सहकाऱ्यांना देऊ शकता. यामुळे तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्रपणे ते शेअर करण्याची गरज राहत नाही.

५. प्रकल्पाचं वेळापत्रक आणि ऐनवेळच्या डेडलाईन पाळण्यासाठी गुगल शिट्सचा उपयोग

अनेकदा मोठ्या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांकडे दिलेल्या असतात. त्या प्रत्येकाचं किती काम झालं आणि एकूण प्रकल्प किती बाकी आहे हे समजणं अनेकदा जिकिरीचं होतं. यावर उपाय म्हणून तुम्ही गुगल शिट्सचा वापर करू शकता. त्याचा एक्सेस सर्वांना देऊन प्रत्येकाने त्यात आपल्या कामाच्या अपडेट्स टाकल्यास एकाच वेळी सर्वांना एकमेकांच्या कामाचा अंदाज येईल. याशिवाय ऐनवेळच्या डेडलाईनचंही नियोजन करता येईल.

६. सहकाऱ्यांसोबत सहजपणे व्हिडीओ मिटिंग आयोजित करा

प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरी तुम्ही गुगल मिटचा उपयोग करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एकमेकांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलू शकता.

७. रिअल टाईममध्ये डॉक्युमेंट संपादित करा

कोणत्याही प्रकल्पावरील कामाच्यावेळी तुम्हाला सहकाऱ्यांना मेल करून स्वतंत्रपणे डॉक्युमेंट, पीपीटी, स्लाईड पाठवण्याची गरज नाही. तुम्ही एकाच जागेवर एडिट करून त्याला अंतिम रूप देऊ शकता.

८. ऑनलाईन प्रेझेंटेशन द्या

तुम्हाला प्रेझेंटेशन देण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. गुगल मिटवरच तुम्ही तुमच्या स्लाईड दाखवू शकता. याशिवाय तुम्ही संबंधित बैठक रेकॉर्ड देखील करू शकता. जेणेकरून ही बैठक नंतर पाहता येईल. याशिवाय तुम्ही बैठकीला कॅप्शन ऑन करू शकता.

९. मोठ्या सहकाऱ्यांच्या समुहासोबत माहितीचं आदानप्रधान

तुम्ही मोठ्या सहकाऱ्यांच्या समुहासोबत माहितीचं आदानप्रधान करू शकता. यासाठी तुम्ही साईट देखील तयार करू शकता.

१०. चुटकीसरशी ग्राहकांची माहिती जमा करा

तुम्ही गुगल फॉर्मचा वापर करून चुटकीसरशी तुमच्या ग्राहकांची माहिती मिळवू शकता. गुगल फॉर्मच्या मदतीने तुम्ही सर्वेक्षण देखील करू शकता.