तंत्रज्ञानामध्ये जसजसे बदल होत चालले आहेत तसतशी नवीन उपकरणे आता बाजारपेठेत येऊ लागली आहेत. त्यातही अनेकांच्या अनेकविध प्रकारच्या गरजा ध्यानात घेऊन त्यानुसार उपकरणांची रचना करण्यात येत आहे. खरे तर आपल्या मोबाईलप्रमाणे लॅपटॉपलाही टचपॅड असते. पण गेल्या काही दिवसांत बाजारात आलेली उपकरणे आणि सॉफ्टवेअर्स यांच्यामध्ये खूप फारकत निर्माण झाली आहे. म्हणजेच िवडोज ८ मायक्रोसॉफ्टने अलीकडेच बाजारात आणले. त्यासाठीचे टचपॅड हे वेगळ्या प्रकारचे असावे लागते. विंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिम विंडोजच्या नव्या गेश्चर्सवर काम करते. त्यामुळे आता त्याला साजेसे आणि त्यावर उत्तम काम करता येईल, असे गेश्चर असलेले नवे टचपॅड लॉजिटेक या कंपनीने बाजारात आणले आहे. संगणकाशी संबंधित सहउपकरणांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लॉजिटेकने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. टच पॉइंट, क्लिक्, स्क्रोल, एज गेश्चर्स, अ‍ॅप स्विचिंग, अ‍ॅप बार, चाम्र्स बार अ‍ॅक्टिवेशन, िपच टू झूम, तीन बोटांनी करायचे स्वाइप आदी अनेक बाबी या टचपॅडच्या माध्यमातून करता येणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे टचपॅड वायरलेस आहे. टी ६५० या वायरलेस मॉडेलमध्ये कर्सर नियंत्रण व्यवस्थित करता येते. हे टचपॅड वजनाने हलके तर आहेच पण ते सडपातळही आहे. .
भारतीय बाजारपेटेतील किंमत : रु. ४,९९५/-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Logiteck vaierless touchpad
First published on: 09-02-2013 at 01:13 IST