20 November 2017

News Flash

टीव्ही खरेदी करताना..

मोबाइल्स व लॅपटॉप्सनंतर अधिक वापर होणारा गॅझेट म्हणजे टीव्ही.

लोकसत्ता टीम | Updated: August 22, 2017 1:49 AM

मोबाइल्स व लॅपटॉप्सनंतर अधिक वापर होणारा गॅझेट म्हणजे टीव्ही.

आपल्या सतत विकसित होत असलेल्या संस्कृतीला नावीन्यता व तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे आणि याच बाबीचा आपल्या जीवनशैलीवर देखील प्रभाव पडला आहे. आपण अधिकाधिक आपल्या गॅझेट्सवर अवलंबून राहू लागलो आहे. म्हणूनच या डिव्हाईसेसचे कार्य व वैशिष्टय़ांबाबत चांगली माहिती असणे, अत्यंत आवश्यक बनले आहे. मोबाइल्स व लॅपटॉप्सनंतर अधिक वापर होणारा गॅझेट म्हणजे टीव्ही. हा मनोरंजनासाठी वापरण्यात येणारा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. पण, टीव्हीबाबतच्या माहितीच्या अभावामुळे टीव्ही घेताना समस्या येऊ  शकते. तसेच त्यावर काय उत्तर आहे याबद्दल ‘ट्रव्हिजन’ या कंपनीचे व्यवसाय परिचलन विभागाचे संचालक सौरभ काब्रा यांनी केलेले मार्गदर्शन..

 स्मार्ट टीव्ही तंत्रज्ञान – स्मार्ट टीव्ही खरेदी करणे म्हणजे दीर्घकाळापर्यंत टिकाऊ  टीव्हीची खात्री. या टीव्हींचे खास वैशिष्टय़ म्हणजे या टीव्हींवर मोबाइल किंवा पीसीमधील फोटोज, व्हिडीओज, चित्रपट, म्युझिक व इतर मीडिया घटक सादर करता येतात. याकरिता कोणत्याही वायर्सचा त्रास होत नाही. यूएसबीच्या माध्यमातून सहजपणे मनोरंजनाचा आनंद घेता येऊ  शकतो. हे स्क्रिन्स-मिररिंग तंत्रज्ञान अ‍ॅण्ड्रॉइड उपकरण किंवा संगणकामधील कोणतेही कन्टेन्ट टीव्हीवर प्रसारित करण्याची सुविधा देते. सर्व गोष्टींची योग्यरीत्या जुळणी केली, तर कोणताच व्यत्यय येणार नाही. व्हिडीओज पाहण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर वापर करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत. तर मग, मिराकास्टच्या माध्यमातून टीव्हीवर आनंद घ्या आणि टीव्हीला इतर उपकरणांशी जोडा.

फुल एचडी – सध्याच्या युगात सर्वोत्तम स्क्रिन तंत्रज्ञानाचा अनुभव मिळतो तो फुल एचडी व १०८० पी वैशिष्टय़ असलेल्या टीव्हीमध्ये. उत्तम अनुभवासाठी सर्वोत्तम चित्र सुस्पष्टता, सखोलता व शार्पनेससह डिझाइन केलेल्या टीव्हीची निवड करा. एक योग्य फुल हाय डेफिनिशन टीव्ही (फुल एचडी) १९२० गुणिले १०८० पिक्सेल्र्सयतचे इमेज रिझोल्यूशन देऊ  शकतो, जो कलर, कॉन्ट्रॅस्ट व क्लिअ‍ॅरिटीच्या परिपूर्ण संयोजनासह सर्वोत्तम व्हिज्युअल अनुभव देऊ  शकतो.

ऊर्जेची बचत – नवीन तंत्रज्ञान दाखल होण्यासोबतच विविध बदल घडून येत आहेत. म्हणून, टीव्हीमध्ये अशा वैशिष्टय़ांचा समावेश असावा, ज्यांचे कमी दुष्परिणाम दिसून येतील. हे वैशिष्टय़ ब्राइट स्क्रिन्सची आवश्यकता नसताना विजेची बचत करण्याकरिता ब्राइटनेसचे समायोजन करते. यामध्ये ब्राइटनेस समायोजित करण्यासाठी बॅकलाइट कंट्रोलचे वैशिष्टय़ समाविष्ट असून स्क्रिन्स ऑफचे देखील वैशिष्टय़ आहे, जे फक्त ऑडिओ प्ले करत चित्र बंद करते आणि स्टॅण्डबाय मोड झीरो वैशिष्टय़  टीव्हीला आपोआपपणे बंद करते, ज्यामुळे विजेची बचत होते.

सुस्पष्ट, उत्तम साऊंड तंत्रज्ञान – उत्तम दृश्यासोबतच उत्तम आवाज तुमच्या मनोरंजनामध्ये अद्भुत भर करतात. क्लीअर वॉइस-२ तंत्रज्ञान हीच गोष्ट तुम्हाला देतात! ते तुम्हाला टीव्हीवरील आवाजाच्या संदर्भात उत्तम अनुभव देतात, हा आवाज सहापट अधिक असतो आणि बॅकग्राऊंड आवाज वाढत असला तरी सुस्पष्ट आवाज मिळण्याची खात्री असते. सराऊंड साऊंड हे आणखी एक वैशिष्टय़ आहे, जे व्यापक आवाज देते आणि तुमचा ऑडिओ अनुभव अधिक वास्तविक बनवेल. ते सुस्पष्ट, उत्तम वास्तविक आवाज देते. व्हिज्युअल व ऑडिओमधील जागतिक दर्जाच्या समन्वयासह, अद्भुत अनुभव घेण्यास सज्ज राहा.

कलरनिर्मिती व सखोलता – हाय डायनॅमिक रेंज हे टीव्हीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नवीन वैशिष्टय़ आहे, जे आकर्षक चित्र व रंगाच्या दर्जाची खात्री देते. या वैशिष्टय़ामध्ये अधिक कलर्स, अधिक कॉन्ट्रॅस्ट लेव्हल्स व ब्राइटनेस देण्याची क्षमता आहे. सुधारित कलर हे भावी काळात अग्रस्थानी असणारे वैशिष्टय़ आहे आणि टीव्ही कंपन्या आता सर्वोत्तम पिक्सेल्सपेक्षा सर्वोत्तम रंगाची सुविधा देत आहेत. म्हणून या काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे.

First Published on August 22, 2017 1:49 am

Web Title: television shopping tips by saurabh kabra