News Flash

खेळातील नवलाई

तंत्रस्नेही मुलांचे मे महिन्यात रोज कोणते खेळे खेळायचे याचे नियोजन झाले असेलच.

 

 

तंत्रस्नेही मुलांचे मे महिन्यात रोज कोणते खेळे खेळायचे याचे नियोजन झाले असेलच. पण या मुलांना आकर्षित करण्यासाठी या महिन्यात अनेक बडय़ा कंपन्या नवीन गेम्स बाजारात आणत आहेत. यामुळे गेमिंग कन्सोलवर प्रेम करणाऱ्या तरुणाईला यंदाच्या मे महिन्यात मेजवानी असणार आहे. पाहूयात या महिन्यात गेमिंग बाजारात कोणते गेम्स येत आहेत.

प्रे

गेमिंगच्या इतिहासात अधिराज्य गाजविलेला मिरर एज या खेळ प्रकारातील साखळीतील गेम्सची आठवण करून देणारा हा गेम आपल्या अंतराळात रमवणारा आहे. आभासी विश्वातील चंद्राच्या कक्षेत तयार करण्यात आलेल्या टालोस १ या अंतराळा स्थानकावरून आपला प्रवास सुरू होतो. या प्रवासात आपल्याला मार्गात अडसर ठरणाऱ्या परग्रहवासीयांचा सामना करावयाचा आहे. हा सामना करण्यासाठी आकर्षक हत्यारे देण्यात आली आहेत. या खेळात देण्यात आलेला आवाजही आकर्षक असून यामुळे गेम खेळताना आगळा अनुभव घेता येऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

 • बाजारात येण्याची तारीख : ५ मे
 • कोणत्या गेमिंग कन्सोलमध्ये चालतो – विंडोज पीसी, पीएस४ आणि एक्सबॉक्स वन
 • किंमत – ३९९९ रुपये.

इनजस्टिस २

मॉर्टल कॉम्बॅट मालिकेची निर्मिती करणारी हेल्मेड ही कंपनी इनजस्टिस २ हा गेम बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या गेममध्ये डीसीचे सुपरहिरोज आणि शत्रू यांच्यातील युद्ध रंगविण्यात आले आहे. यातील पहिला गेम हा बॅटमॅन विरुद्ध सुपरमॅन या गेमला पर्याय ठरू शकणारा असा आहे. इनजस्टिस २मध्ये हिरोंना चतुर बनविण्यात आले आहे. यासाठी यामध्ये खास पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे हा गेम अधिक रंजक होणार आहे. या गेमध्ये चांगले कथानक असण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय यात मायरेड ऑफ कॉम्बोज लूट ड्रॉपिंग प्रणाली यामुळे तुम्हाला तुमच्या खेळाची आकडेवारी नियंत्रित करता येऊ शकते.

 • बाजारात येण्याची तारीख : १६ मे
 • कोणत्या गेमिंग कन्सोलमध्ये चालतो – पीएस४ आणि एक्सबॉक्स वन
 • किंमत – ३४९९ रुपये.

 

फायर एम्ब्लेम इकोज : श्ॉडोज ऑफ व्हॅलेंशिआ

संगणकारील गेम्स स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ लागल्यानंतर यामध्ये आघाडीवर असलेल्या फायर एम्ब्लेम इकोज : श्ॉडोज ऑफ व्हॅलेंशिआ या गेमची पुढची आवृत्ती संगणक आणि कन्सोलवर येत आहे. हा गेम नितांडोचा असल्यामुळे यामध्ये अधिक कल्पकता असणे अपेक्षित आहे. या गेममध्ये तुम्हाला विविध टप्प्यांवर स्वत:चे अस्तित्व टिकवण्यिासाठी लढा द्यावा लागतो. या गेममध्ये तुम्ही पूर्वीच्या आवृत्तीच्या तुलनेत जास्त वेळ खेळू शकणार आहात शिवाय यात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष यंत्रणाही दिली आहे. यामुळे या गेमच्या आधीच्या अवृत्तींच्या तुलनेत हा गेम अधिक आकर्षक आणि खेळात रमवणारा असणार आहे.

 • बाजारात येण्याची तारीख : १९ मे
 • कोणत्या गेमिंग कन्सोलमध्ये चालतो – नितांडो ३डीएस
 • किंमत – २६०० रुपये.

स्टार्फ

गेम विकासकांमध्ये सामन्यत: आढळणारी उचलेगिरी न करणाऱ्यांपैकी एक म्हणजे स्टार्फ. या गेममध्ये दरवेळेस नव्याने काहीतरी दिलेले असते. या मे महिन्यात बाजारात दाखल होणाऱ्या गेममध्ये अनोखे शूटर मशीन देण्यात आले आहे. या गेममध्ये विविध धारदार हत्यारांचा वापर करून आपल्याला शत्रूंचा सामना करायचा असतो. याशिवाय यात शॉटगन, रॉकेट लाँचर्स, रेलगनसारखी हत्यारेही देण्यात आली आहेत. २०१६मध्ये गेमिंग राज्यात अधिराज्य गाजविणाऱ्या डूमची दुसरी आवृत्ती येईपर्यंत  हा गेम तुमची गरज भागवू शकणार आहे.

 • बाजारात येण्याची तारीख : ९ मे
 • कोणत्या गेमिंग कन्सोलमध्ये चालतो – लिनक्स, मॅक ओएस, विंडोज पीसी, पीएस४
 • किंमत – ५६५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:01 am

Web Title: video games culture injustice 2
Next Stories
1 थोडा है, थोडे की..
2 लघुउद्योगांचे ‘ऑनलाइन’ अस्तित्व महत्त्वाचे
3 दमदार आवाजाची अनुभूती
Just Now!
X