भारतीय समाजात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात मोठा सोहळा असतो. पदरी पैसा असो की नको, आर्थिक क्षमता असो की नसो, लग्नावर मात्र ऐपतीपेक्षा अधिक खर्च करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. वधुवराचा पोशाख, लग्नसोहळ्याची तयारी आणि जेवणखाण यासोबतच लग्नसमारंभातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो आहेराचा. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना परतीचा आहेर देण्याची प्रथा तर अलीकडे चांगलीच रुजू लागली आहे. त्यामुळे लग्नाचा बस्ता बांधताना ‘रिटर्न गिफ्ट’चीही तयारी केली जाते. परंतु, लग्नसमारंभात मानपानासाठी अडून बसणाऱ्यांची संख्या कमी नसते.

प्रत्येक लग्नात मानपानावरून पाहुणेमंडळींचे टोमणे, नाराजी वधूवराच्या कुटुंबीयांना झेलावी लागतात. त्यामुळे परतीचा आहेर चांगला आणि पाहुण्यांना आवडेल, असा निवडतानाच तो आपल्या बजेटमध्येही बसेल, याकडे लक्ष द्यावे लागते. नेमकी हीच बाब हेरून ‘व्हाइटनाइफ’ नावाने सुरू झालेल्या स्टार्टअपमधून परतीचा आहेर पुरवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. तरुण उद्योजिका सोनिया अगरवाल यांनी ही कल्पना अस्तित्वात आणली असून या ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून परतीच्या आहेराचे वेगवेगळे पर्याय निवडता येतात.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
6th April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
६ एप्रिल पंचांग: शनीप्रदोष तुमच्या राशीसाठी काय फळ देणार? दुपारी ‘हा’ ४६ मिनिटांचा मुहूर्त आहे सर्वात शुभ
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

‘पूर्वीच्या काळात विवाहसोहळे अतिशय आटोपशीर असायचे. परंतु आता टीव्ही, चित्रपट आणि समाजमाध्यमे यांचा वाढता प्रभाव आणि वाढलेली क्रयशक्ती यांमुळे मराठी समाजांतील विवाहसोहळेही अतिशय थाटामाटात आणि भव्य स्वरूपात साजरे करण्याकडे कल वाढत चालला आहे. लग्नसोहळा वैशिष्टय़पूर्ण ठरावा यासाठी यजमान मंडळी जास्तीत जास्त भर देऊ लागले आहेत. यातूनच परतीच्या आहेराची संकल्पना रुजू लागली आहे,’ असे सोनिया यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत लोकांकडे वेळ व मनुष्यबळाची कमतरता यामुळे लोकांना योग्य असे परतीच्या आहेर निवडण्यासाठी वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणूनच ‘व्हाइटनाइफ’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सर्व जाती, धर्म, संस्कृतीला साजेशा अशा परतीच्या आहेराचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच या सर्व वस्तू आकर्षक पॅकिंग करून पुरवण्यात येतात.

‘व्हाइटनाइफ’ हे ईकॉमर्स संकेतस्थळ असून त्यावर जगभरातील फॅशनब्रॅण्डचे कपडे उपलब्ध आहेत. मात्र आता या संकेतस्थळावरून ‘रिटर्न गिफ्ट’चा पर्यायही उपलब्ध झाला आहे. ‘मराठी लग्नात परतीचा आहेर म्हणून पेशवाई थाटाच्या वस्तू, पारंपरिक वस्तू, सुगंधित मेणबत्त्या, नैसर्गिक घटकापासून बनविलेली सौंदर्यप्रसाधने, हस्तकलांच्या वस्तू तसेच छोटय़ा चांदीच्या वस्तूंना मोठया प्रमाणात मागणी असते. या गोष्टी ‘व्हाइटनाइफ’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येत आहेत,’ असे सोनिया यांनी सांगितले.