भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत धुमाकूळ घातलेल्या ‘शाओमी’ या चीनी मोबाईल कंपनीचा बहुप्रतिक्षीत ‘एमआय-५’ हा स्मार्टफोनच्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या फेब्रुवारीत ‘एमआय-५’ बाजारात दाखल होणार आहे.
काही दिवसांपूर्वी एमआय-५ चे फिचर्स इंटरनेटवर लिक झाले होते. एमआय-५ मध्ये ८२० स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या समोरील बाजूस २.५ डी ग्लास आणि मागील बाजू ‘एमआय नोट’ सारखीच असणार आहे.  विशेष म्हणजे, ‘एमआय ५’ च्या मागच्या बाजूस ड्युअल एनईडी फ्लॅशसोबत रिअर कॅमेराही असेल. ‘एमआय ५’ ला तब्बल १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. स्मार्टफोनची यंत्रणा सुसह्य आणि अधिक सुलभ पद्धतीने वापरता येण्यासाठी ‘एमआय-५’ ला ४ जीबीची रॅम देण्यात आली आहे. लॉलीपॉप ५.१.१ व्हर्जनच्या अद्ययावत प्रणालीवर हा स्मार्टफोन कार्य करेल. हा स्मार्टफोन १६ आणि ६४ जीबी प्रकारात उपलब्ध होईल. स्मार्टफोनची किंमत अद्याप कळू शकलेली नाही. त्यासाठी तंत्रप्रेमींना फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.