महिन्याला किमान तीन अशा दराने स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत. या फोन्समध्ये नावीन्य काय, तर कुणाचा कॅमेरा आठ तर कुणाचा तेरा मेगापिक्सेलचा. कुणाच्या फोनमध्ये दोन जीबी तर कुणाच्या फोनमध्ये चार जीबी रॅम. यापलीकडे स्मार्टफोन जात नव्हता. पण स्मार्टफोनचा वापर तर मोठय़ा प्रमाणावर वाढत होता. इतकेच नव्हे तर तो म्युझिक सिस्टीमपासून संगणक आणि लॅपटॉपला पर्याय ठरू लागला आहे. यामुळे यामध्ये नवीन काय द्यायचे, असा प्रश्न जेव्हा कंपन्यांसमोर उभा राहिला तेव्हा पहिल्यांदा टचस्क्रीन भारतीय बाजारात आणणाऱ्या एलजीने संशोधन करीत वापरकर्त्यांच्या सवयींनुसार संशोधन करून स्मार्टच्या पलीकडे नेणारा मॉडय़ुलर एलजी जी5 हा फोन बाजारात दाखल केला. यानिमित्ताने स्मार्टफोनच्या संशोधनाला गती मिळाली आहे. या फोनच्या निमित्ताने झालेले संशोधन आणि वापरसुलभ करणाऱ्या इतर सुविधांविषयी जाणून घेऊ या.
* स्मार्टफोन वापरकर्ता वेळ पाहण्यासाठी किंवा नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी दिवसाला किमान १५० वेळा फोनच्या स्क्रीनमध्ये डोकावत असतो. स्क्रीन अनलॉक करतो आणि पाहतो. वापरकर्त्यांच्या या सवयीचा विचार करून कंपनीने लॉक स्क्रीनवरच वेळ आणि नोटिफिकेशन अलर्ट दिले आहेत. यामुळे आपल्याला फोनचे अनलॉक बटण न दाबता वेळ आणि नोटिफिकेशन आले आहे की नाही हे पाहता येऊ शकते. यासाठी ऑलवेज ऑन डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे बॅटरी खर्च होण्यात फारसा परिणाम होत नाही. फोनची बॅटरी तासाला ०.८ टक्के इतकीच खर्च होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
* बॅटरी काढणे ही एक सर्वाच्या दृष्टीने डोकेदुखी असते. यामुळे या फोनमध्ये बॅटरी काढण्यासाठी स्लाइड आऊट पर्यायाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोनच्या खालच्या बाजूस देण्यात आलेल्या स्वाइप पर्यायाचा वापर करून बॅटरी काढणे सोपे होते.
* यामध्ये सर्वात जलद असा क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२० हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे, ज्यामुळे फोनचा वेग अधिक वाढतो.
* बॅटरी जलद गतीने चार्जिग होण्यासाठी फोनमध्ये क्विकचार्ज तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे २८०० एमएएचची बॅटरी कमीत कमी वेळात चार्ज होणे शक्य होते.
* फोनमध्ये अत्याधुनिक दर्जाचा कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये वाइड अँगल लेन्सेस वापरण्यात आले आहेत. सामान्यत: फोनमध्ये ७८ अंशांचे लेन्सेस वापरले जातात, ते या फोनमध्ये १३५ अशांचे वापरण्यात आले आहेत. याशिवाय फोनमध्ये कॅमेरा सॉफ्टवेअरही अत्याधुनिक देण्यात आले असून यामुळे फिल्म इफेक्ट, ऑटो शॉट, पॉपआऊट फोटोज अशा सुविधा वापरता येणे शक्य झाले आहे.
* याशिवाय या फोनसोबत एलजी कॅम प्लस, एलजी ३६० व्हीआर ग्लॉस आणि एलजी ३६० कॅम बाजारात आणले आहेत.
* यापैकी एलजी कॅम प्लस आपण आपल्या फोनला लावून अधिक चांगले छायाचित्रण करता येऊ शकते.
* तर आभासी जगात वावरण्यासाठी व्हच्र्युअल ग्लासचा वापर करता येऊ शकतो. फोनमधील व्हच्र्युअल ग्लास ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ग्लासच्या तुलनेत वजनाने हलकी आणि अधिक सुस्पष्ट आहे. याचबरोबर याला जास्त लांबीची वायर देण्यात आली आहे. जेणेकरून फोन खिशात ठेवून आपण ग्लास वापरू शकतो.
* एलजी ३६० कॅमेरामध्ये १३ मेगापिक्सेलच्या साहय्याने आपण सर्व बाजूंचे चित्रीकरण करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याशिवाय फोनची इतर वैशिष्टय़े
* यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२० हा जलद प्रोसेसर वापरण्यात आला आहे, ज्याच्यामुळे फोन अधिक जलद काम करू शकतो.
* फोनमध्ये ५.३ इंचांचा क्वाड एचडी आयपीएस क्वान्टम डिस्प्ले वापरण्यात आला आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे फोन लॉक असतानाही आपल्याला डिस्प्लेवर नोटिफिकेशन अलर्ट पाहता येणार आहेत.
* यामध्ये चार जीबी रॅम आणि ३२ जीबी रोम देण्यात आला असून फोनमध्ये मायक्रो एसडीच्या साह्य़ाने दोन टीबीपर्यंतची साठवणूक करता येणार आहे.
* याचा मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सेल तर फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे.
* यात रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली असून तिची क्षमता २८०० एमएएच इतकी आहे.
* यात अँड्रॉइडचे ६.० मार्शमॅलो ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे.
* याचे वजन १५९ ग्रॅम इतके असून यात एलटीई, थ्रीजी आणि टूजी जोडणी उपलब्ध आहे.
* या फोनची किंमत ५२,९९० रुपये असून तो सध्या केवळ फ्लिपकार्ट या ई-वाणिज्य संकेतस्थळावर विक्रीस उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beyond smartphone
First published on: 07-06-2016 at 05:21 IST