स्मार्टहोम म्हणजे नेमकं काय आणि त्याचं तंत्रज्ञान कसं काय काम करतं याविषयी आपण गेल्या आठवडय़ात पाहिलं. हे प्रकरण आपल्या घरात कसं आणता येईल आणि तेही वाजवी दरात हे बघूया. मुळात स्मार्टहोम म्हणजे महागडे चोचले हे मत डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. सध्याच्या घडीला बाजारात अनेक कंपन्यांची उपकरणं आणि अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. घरगुती उपकरणं, इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स तसंच ऑनलाइनही ही उपकरणं मिळू शकतात. तसंच एखाद्या स्थानिक इलेक्ट्रिशिअनकडून घरात इन्स्टॉलही करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्सटेन आणि झेड-वेव्ह या दोनपैकी एक टेक्नॉलॉजी कुठल्याही उपकरणांमध्ये वापरली जाते. त्यामुळे समान तंत्रज्ञान असणारी उपकरणं घ्या. म्हणजे संपूर्ण घरात एक्सटेन टेक्नॉलॉजी असणारीच उपकरणं असू द्या किंवा झेड-वेव्हची. अर्धी एक्सटेन आणि उरलेली झेड-वेव्हची इन्स्टॉल करणं जरा किचकट ठरू शकतं.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart home devices for home automation
First published on: 30-05-2017 at 05:38 IST