सात जखमी कासवांना उपचारानंतर समुद्रात सोडले

डहाणूच्या वन्यप्राणी चिकित्सा केंद्रात उपचारासाठी दाखल असलेल्या सात कासवांना शुक्रवारी समुद्रात सोडण्यात आले. यापैकी काही कासव दोन महिन्यांपासून या केंद्रात ५२ कासवांवर उपचार सुरू आहेत.

समुद्रात मासेमारीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकून अनेक कासवे जखमी होत असतात. अशा कासवांवर डहाणू येथील वन्य प्राणी चिकित्सा केंद्रात उपचार केले जातात. या केंद्रात पंख कापलेल्या कासवांना कृत्रिम प्लास्टिक पंख लावून समुद्रात पोहण्यासाठी सक्षम बनवले जाते. असे मागील दोन महिन्यांपासून तब्बल ५२ जखमी कासवांवर डहाणू येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी वन विभागाच्या अथक प्रयत्नातून तब्बल ७ पूर्णपणे बरे झालेल्या कासवांना शुक्रवारी संध्याकाळी समुद्रात सोडण्यात आले. सध्या केंद्रात ४५ जखमी कासवांवर उपचार सुरू आहेत.

डहाणू समुद्राच्या खाडीमुखाजवळील पाण्यात डहाणू उपवन संरक्षक नानासाहेब लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली सोडण्यात आले.

जखमी कासवांपैकी काहीवर दोन वर्षांपासून तर काहींवर कासवांवर चार महिन्यांपासून उपचार सुरू होते. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शनचे धवल कंसारा डहाणू वन विभागाचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. स्थानिक मासेमारी नौकेद्वारे ही कासवे खोल समुद्रात सुखरूपपणे सोडण्यात आली.