घोडबंदर सेवा रस्ते मोकळे करण्याची ठाणे महापालिकेची कारवाई रविवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार सुरू होती. ओवळा नाका, गरीब नगर ते भाईंदरपाडा या पट्टय़ात बाधित होणाऱ्या जवळपास १७५ बांधकामांवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान शनिवार पासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये एकूण ३४५ बांधकामे तोडण्यात आली.

कारवाईमध्ये ओवळा नाका, गरीब नगर ते भाईंदरपाडा या टापूतील जवळपास १७५ बाधित बांधकामे तोडण्यात आली. या कारवाईबाबतची सर्व कायदेशीर कार्यवाही दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आली असून कासारवडवली नाका ते बाळकुम या टप्प्यात बाधित होणाऱ्या बांधकामांचे सर्वेक्षण करुन पात्र आणि अपात्र यांची यादीही निश्चित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे घोडबंदर सव्‍‌र्हिस रोड मोकळा होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.