28 November 2020

News Flash

वाद झाल्याने दुचाकी पेटवली

टुंबातील सर्व सदस्यांनी रात्री बाहेर येऊन दुचाकीला लागलेली आग नियंत्रणात आणली.

(संग्रहित छायाचित्र)

भाईंदर : उत्तन परिसरात दुचाकी जवळ लघुशंका करण्यास रोखल्यामुळे चक्क दुचाकीच  पेटवल्याची घटना घडली आहे.उत्तनच्या शिरेरोड गावातील डीलॉन हेनड्रिक्स हे मंगळवारी सायंकाळी कुटुंबासह बाल्कनीमध्ये बसले असता घरासमोर त्यांच्या दुचाकीजवळ एक अनोळखी इसम लघुशंका करत होता.

त्यांनी त्यास हटकले असता त्याने त्यांच्यासोबत धकाबुक्की करून वाद घातला व तो निघून गेला.  मात्र, रात्री अडीच वाजताच्या हेनड्रिक्स यांना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांची दुचाकी  कोणीतरी जाळल्याची माहिती दिली.

त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्री बाहेर येऊन दुचाकीला लागलेली आग नियंत्रणात आणली. हा संपूर्ण प्रकार  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची तक्रार हेनड्रिक्स यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी परिसरात तपास सुरु केला असून सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 1:43 am

Web Title: bike caught fire due to an argument in uttan zws 70
Next Stories
1 नवऱ्याला टक्कल असल्याचं लग्नानंतर झालं माहिती; नववधूची पोलिसांत तक्रार
2 नालासोपारा : थर्माकोल कंपनीला भीषण आग, जीवितहानी नाही
3 पालघर: महिलांसोबतचे ६५ व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करणारा बस कंडक्टर अखेर गजाआड
Just Now!
X