25 January 2021

News Flash

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक

आत्महत्येला प्रोत्साहित करणे आणि जादूटोणा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा

भाईंदर : अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी सात महिन्यांनंतर तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला अटक केली आहे. आत्महत्येला प्रोत्साहित करणे आणि जादूटोणा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा रोड येथील शिवार गार्डन परिसरात राहणाऱ्या सेजल शर्मा या टीव्ही अभिनेत्रीने २४ जानेवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी सात महिन्यांनंतर तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी सेजल आणि आदित्यचे भांडण झाले होते. तसेच त्याने सेजलकडून पैसेदेखील घेतले होते; परंतु ते परत करण्यास टाळाटाळ करत होता.

जादूटोणा करून चित्रपटात मुख्य भूमिका मिळवून देणार असल्याचे तो सेजलला सांगत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे मीरा रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रोत्साहित करणे आणि जादूटोणाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:26 am

Web Title: boyfriend arrested in actress sejal sharma suicide case zws 70
Next Stories
1 पाना-फुलांनी सजलेल्या गौराईच्या आगमनाची चाहूल
2 ठाणे जिल्ह्य़ात ८५९ नवे रुग्ण
3 खात्री पटल्यानंतरच निर्बंधांत आणखी शिथिलता
Just Now!
X