६० लाखांचा अपहार केल्याची तक्रार; शाळेतील प्रवेशासाठी पैसे घेत असल्याचाही आरोप

सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या विरारमधील सेंट पीटर शाळेच्या व्यवस्थापनामध्ये असलेल्या मतभेदांतून शाळेच्या अध्यक्षांसह सात जणांवर तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या नावाने बनावट बँकखाते तयार करणे, नकली विश्वस्त तयार करून साठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अध्यक्ष जॉयसन पीटर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून शाळेत धार्मिक गोष्टींना आक्षेप घेतल्यामुळेच ही तक्रार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

सॅमसन एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्त मिलिंद मेहता यांच्या तक्रारीनंतर सेंट पीटर शाळेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण २००३ मध्ये जॉयसन पीटर यांच्यासोबत ट्रस्ट स्थापन करून सेंट पीटर शाळा सुरू केली होती, असे मेहता यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्या वेळी मिलिंद मेहता, त्यांची पत्नी सोनल, जॉयसन पीटर आणि त्यांची पत्नी जास्मिन हे चार विश्वस्त होते. आर्थिक व्यवहार मेहता आणि पीटर यांच्या सहीने करण्यात येत होते. पीटर अध्यक्ष होते आणि मेहता सरचिटणीस होते. परंतु काही वर्षांनंतर पीटर यांनी मनमानी पद्धतीने शाळेचा कारभार सुरू केल्याचा आरोप मेहता यांनी तक्रारीत केला आहे. शाळेत प्रवेशासाठी कर्मचारी पालकांकडून पैसे उकळत असल्याची तक्रारही मेहता यांनी केली आहे.

जॉयसन पीटर रोखीन व्यवहार करत होते असा आरोप त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र बँक खाते तयार केले होते. त्यातून ते पैशांचा व्यवहार करत होते, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय पीटर यांनी रोमियो पीटर, ब्रेन मायकल, संदेश जाडकर, अ‍ॅलेक्स एक्का आणि व्हिक्टर लोबो यांना घेऊन दुसरा ट्रस्ट बनवल्याचा आरोप त्यांनी केला. पीटर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किमान ६० लाखांचा अपहार केल्याचा आरोप मेहता यांनी तक्रारीत केला आहे. तुळींज पोलिसांनी या सातही आरोपींविरोधात   गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ठाण्याच्या धर्मादाय आयुक्त आणि शिक्षण विभागाकडेही मेहता यांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, पीटर आणि अन्य आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवल्याने त्यांची अटक टळली आहे.

आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आम्ही शाळेचे विश्वस्त पीटर जॉयसन यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास चालू आहे. ऑक्टोबर महिन्यात आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही ते तपासणीसाठी विधि समितीकडे पाठवले होते. त्यानंतरच हा गुन्हा दाखल केला आहे.

– किरण कबाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे</strong>

मेहता यांनी केलेल्या तक्रारी या बिनबुडाच्या आहेत. शाळेत धार्मिक गोष्टींना आक्षेप घेतल्यानंतरच मेहता यांनी विरोधात वागणे सुरू केले होते. ते शाळेच्या खर्चासाठी लागणाऱ्या धनादेशावर सह्य़ा करत नव्हते. त्यामुळे दुसरे खाते बनवावे लागले. दुसरा ट्रस्ट स्थापन करण्यापूर्वी मेहता यांना कळवलेले होते. तसे कायदेशीर पत्रही त्यांना वेळोवेळी देण्यात आलेले होते. परंतु त्यांनी त्याला दाद दिली नाही. मी किंवा कुठल्याही विश्वस्तांनी अपहार केलेला नाही. आम्ही कायद्याने पुढची लढाई लढणार आहोत.

– जॉयसन पीटर, विश्वस्त सेंट पीटर शाळा