19 October 2019

News Flash

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, शहाडजवळ तांत्रिक बिघाड

गुरुवारी सकाळी कल्याण - टिटवाळा मार्गावर शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला.

(संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल सुरुच असून कल्याण- टिटवाळा मार्गावर शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.

गुरुवारी सकाळी कल्याण – टिटवाळा मार्गावर शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कल्याणवरुन टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केला असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

बुधवारी कर्जत- भिवपूरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर गेल्या आठवड्यातही २ जानेवारी रोजी दिवसभरात तीन ठिकाणी रेल्वे रुळाला तडे गेल्याचे उघड झाल्याने वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

First Published on January 10, 2019 8:06 am

Web Title: central railway technical failure at shahad station local trains delayed