17 February 2019

News Flash

जोशी-बेडेकर महाविद्यालयात स्वच्छता अभियान

यात महाविद्यालयातील सुमारे १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि स्वच्छता राखण्याची  प्रतिज्ञा घेतली.

(संग्रहित छायाचित्र)

गुरुप्रीत शिरकर

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात विद्यार्थी मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वच्छता पंधरवडय़ाच्याअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात महाविद्यालयातील सुमारे १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि स्वच्छता राखण्याची  प्रतिज्ञा घेतली. स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयातील वाणिज्य, कला तसेच विधिशास्त्र इमारत, महाविद्यालयातील आवार आणि सह्य़ाद्री जैवविविधता उद्यान स्वच्छ  करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी पथनाटय़ सादर करून महाविद्यालयामध्ये जनजागृती केली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान पार पडले. या कार्यक्रमात पदवी महाविद्यालयाच्या  उपप्राचार्या मोनिका देशपांडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संगीता दीक्षित तसेच महाविद्यालयातील विविध विभागाचे व्यवस्थापक आणि प्राध्यापक यांचा सहभाग होता. प्रा. नीलम शेख, प्रा. सुप्रिया मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी निकिता जोशी, भाग्यश्री निमकर, मानसी वझे आणि राहुल देशपांडे यांनी अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.

First Published on August 18, 2018 1:46 am

Web Title: cleanliness campaign in joshi bedekar college