पाळीव प्राण्यांना आकर्षक बनवण्याकडे ‘पालकां’चा कल; दोन हजारांपेक्षा जास्त रुपये मोजण्याची तयारी

पाळीव प्राणी म्हणून घरात दाखल झाल्यानंतर कुटुंबाचाच एक घटक बनलेल्या श्वान-मांजरांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेण्यासोबतच आता त्यांचे सौंदर्य खुलवण्याकडेही ‘पालकांचा’ कल वाढला आहे. यासाठीच मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी खास ‘पेट स्पा’ आणि ‘पेट सलून’ सुरू झाले असून त्या ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला नेऊन त्यांची आकर्षक केशभूषा करणे, मालिश करून घेणे, नखे व्यवस्थित करून घेणे आदी गोष्टी करण्याकडे ओढा वाढत चालला आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

अलीकडच्या काळात घरात एक तरी पाळीव प्राणी असावा, याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, त्यातही आपला श्वान किंवा मांजर अधिक आकर्षक कसा दिसेल, याकडेही प्राणीपालक आता खास लक्ष देऊ लागले आहेत. श्वानांच्या प्रजातीनुसार त्यांची केशभूषा तसेच आकर्षक दिसण्यासाठी जीन्स पँट, केसांचा चंबू (झुबा) बांधण्यासाठी रंगीबेरंगी रिबन्स असे विविध प्रकारचे प्राण्यांचे फॅशन साहित्य ठाणे, मुंबईतील बाजारामध्ये दिसत आहे.

याशिवाय फक्त प्राण्यांसाठीचे ‘स्पा’ व सलूनदेखील सुरू झाले आहेत. या ठिकाणी श्वानांच्या केसांचे डीप कंडिशनिंग, स्कीन स्मुथिंग, तेलमालिश, नखे कापणे, कान स्वच्छ करणे आदी गोष्ट केल्या जातात. याशिवाय श्वानांच्या वेगवेगळय़ा केशभूषाही करून दिल्या जातात. परदेशी जातीच्या श्वानांमध्ये केशभूषेला विशेष महत्त्व दिले जाते. टॉय ब्रीड प्रकारात मोडणाऱ्या शित्झू श्वानांचे लांब केस सरळ करून या श्वानांच्या डोक्यावर चंबू बांधला जातो, अशी माहिती डोंबिवलीतील श्वान प्रशिक्षक सागर हर्शे यांनी दिली. तसेच श्वानांच्या केशभूषेमध्ये डॉल कट, बेबी कट असे केशभूषेचे प्रकार केले जातात. केसांचे ट्रिमिंग (बारीक करणे), संपूर्ण केस कर्तन सलूनमध्ये केले जाते. अशा प्रकारच्या ‘ग्रूमिंग’साठी दोन हजारांपेक्षा जास्त रुपये मोजण्याची पालक दाखवतात, अशी माहिती सलूनचालकांनी दिली. वेगवेगळ्या पद्धतीने श्वानांचे सौंदर्य खुलवणारे हे फॅशन साहित्य ठाण्याच्या बाजारात अडीचशे रुपयांपासून उपलब्ध असून काही ऑनलाइन संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.

खरेदी श्वानांच्या फॅशनसाठी.

श्वानांसाठी कपडे, पावसाळ्यात रेनकोट, थंडीच्या हंगामात स्वेटर्स, विशिष्ट प्रजातीनुसार गळ्यात घालायच्या पट्टय़ांचे प्रकार, अंघोळीसाठी शॅम्पू, केसांना बांधण्यासाठी बँड, रिबन्स अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी ठाणे, मुंबईतील श्वानपालकांची गर्दी होत असते. श्वानांसाठी गॉगल, शॉर्ट पॅन्ट्स, गळ्यात घालण्यासाठी माळा, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, मोजे, शूज असे श्वानांचे फॅशन साहित्य खरेदी करण्यासाठी श्वान पालक उत्सुक असतात, असे ठाण्यातील ‘आय लव्ह जस्ट डॉग्ज’ या श्वानांच्या उपयुक्त वस्तू विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक जय निंबाळकर यांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी विशेष तंत्र

घरात पाळण्यात येणाऱ्या श्वानांच्या स्वच्छतेसाठी केवळ अंघोळीचा पर्याय न ठेवता  श्वानांसाठी ‘मायक्रो बबल बाथ’ या विशेष तंत्राचा वापर केला जात आहे. श्वानांना अंघोळ घालण्यासाठी तसेच त्वचेवरील धूळ पूर्णत: नष्ट करण्यासाठी या मायक्रो बबल बाथचा उपयोग केला जातो. या अंघोळीच्या भांडय़ातील पाण्यात असणारे लहान बुडबुडे श्वानांच्या त्वचेवरील धूळ नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते, अशी माहिती या व्यवसायात सक्रिय असलेले आशीष अँथोनी यांनी दिली.