पूर्वीच्या काळी गुरूकडून प्राप्त झालेल्या विद्येच्या बदल्यात कृतज्ञता म्हणून शिष्यगणांकडून यथाशक्ती दक्षिणा देण्याची प्रथा होती. आता काळानुरूप त्या प्रथेत बदल करून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला, शाळेतील गरजू मुलांना मदत करावी, असे आवाहन बुजुर्ग शिक्षिका पुष्पा बाबर आणि नीता बेहेरे यांनी केले. येथील महात्मा गांधी विद्यालयातून १९७५ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे सहकुटुंब पुनर्भेट संमेलन रविवारी रोटरी सभागृहात पार पडले. या सोहळ्यात उपरोक्त दोन शिक्षिकांसह पंढरीनाथ थिटमे हे शिक्षकही आवर्जून उपस्थित होते.
विकास गुप्ते, किरण रणदिवे, समीर पोतनीस, जयंत कुलकर्णी, प्रदीप खानविलकर, अविनाश लघाटे, जयश्री गुप्ते, सुनीता बनकर, विद्या नवांगुळ, अनघा लिखिते, गणेश डाके, नरेंद्र लेले, राजू मोरे, श्रीरंग पंडित, पप्पू पसारकर, किशोर महाडिक, राघू देरकल आदी माजी विद्यार्थी सहकुटुंब या संमेलनास उपस्थित होते. या संमेलनासाठी खास देश-विदेशातून माजी विद्यार्थी अंबरनाथमध्ये आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

चूक-भूल

‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या शुक्रवार, ता. १४ ऑगस्टच्या अंकातील बातमीमध्ये अनवधनाने चुकीचे छायाचित्र छापले गेले होते. ते छायाचित्र अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयातून १९७५ मध्ये दहावी उत्तीर्ण झलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेट संमेलनाचे होते.