21 March 2019

News Flash

डोंबिवली एमआयडीसीतील आरती केमिकल्सला आग

आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या आरती केमिकल्स या कंपनीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आरती केमिकल्स ही डोंबिवलीतील किचन क्राफ्ट कंपनी आहे. या ठिकाणी नेमकी आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

First Published on May 14, 2018 6:50 pm

Web Title: fire at aarti chemicals in dombivli midc