27 September 2020

News Flash

बदलापूर एमआयडीसीत भीषण आग

आगीमुळे कंपनीतील केमिकल ड्रम्सचा स्फोट होत असून आवाजाने परिसर हादरला आहे

बदलापूर एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. प्लॅटिनम पॉलिमर कंपनीला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे कंपनीतील केमिकल ड्रम्सचा स्फोट होत असून आवाजाने परिसर हादरला आहे.

सुदैवाने शुक्रवार असल्याने कंपनीतील काम बंद होते. यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र आग वाढत असून ती लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आग विझवण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 12:12 pm

Web Title: fire in badlapur midc
Next Stories
1 घोडबंदरच्या कोंडीतून मार्ग
2 मेट्रोच्या परवानग्यांसाठी पालिकेची ‘लगीनघाई’
3 दिव्यात पादचाऱ्यांचा जीव मुठीत
Just Now!
X