News Flash

लुईसवाडीमध्ये आगीत कार भस्मसात

रस्त्याच्या मधोमधच कारला आग लागल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

| March 16, 2016 12:25 am

 

ठाणे येथील लुईसवाडी परिसरात एका कारच्या इंजिनमध्ये अचानकपणे आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असून या आगीत कार जळून खाक झाली. या घटनेत कारचालक मात्र सुदैवाने बचावला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरच ही घटना घडल्यामुळे या मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.

कळवा परिसरात राहणारे चंदन नवनीत चतुर्वेदी यांची ही कार आहे. मंगळवारी रात्री ते कारने मुंबईहून घरी परतत होते. त्या वेळी कारमध्ये ते एकटेच होते. मुंबई-नाशिक महामार्गाने कळव्याच्या दिशेने कार घेऊन जात असतानाच नितीन कंपनी येथील लुईसवाडी भागात कारच्या इंजिनने अचानकपणे पेट घेतला. ही बाब लक्षात येताच ते कारमधून बाहेर पडले. रस्त्याच्या मधोमधच कारला आग लागल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 12:25 am

Web Title: fire take place in car at louis wadi thane
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईवर विहिरींचा उतारा
2 ठाणे स्टेशन रस्त्यावर भुयारी बाजारपेठ ; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेची योजना
3 ठाण्याच्या नाक्यावर रिक्षांची गुंडगिरी
Just Now!
X