केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान चंदीगड येथे होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील २३ प्रकल्प सादर होणार असून, त्यातील सर्वाधिक पाच प्रकल्प ठाणे जिल्ह्य़ातील आहेत.
यावर्षीचा विषय ‘समजून घेऊन हवा आणि हवामान’ हा होता. संपूर्ण राज्यात ३१ जिल्ह्य़ांमधून साधारण २५०० पेक्षा अधिक प्रकल्प सादर केले गेले. यामधील जिल्हा आणि राज्य पूर्व चाळणीतून ६६ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली होती. राज्यस्तरावर सादर केलेल्या प्रकल्पातून २७ प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रातील बालविज्ञान परिषदेच्या आयोजनाचे राज्य समन्वयक आहे.
यंदा ठाणे जिल्ह्य़ातून पाच, धुळे-तीन, नवी मुंबई, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम, कोल्हापूर, पुणे येथून प्रत्येकी दोन, लातूर, रत्नागिरी, अकोला, उस्मानाबाद, अहमदनगर, नांदेड, चंद्रपूर येथून प्रत्येकी एका प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.

ठाण्यातील प्रकल्प
*शाळेचे नाव : डॉ. बेडेकर विद्यमंदिर, ठाणे गटप्रमुख व सहभागी विदा ऋचा जोशी, प्रज्ञा मोरे, सृष्टी चौधरी, साक्षी पवार, श्रुती  खांडेकर
प्रकल्पाचे नाव : सभोवतालच्या हरितगृह वायुंचा हवेवरील परिणाम अभ्यासणे
मार्गदर्शक शिक्षक : उज्ज्वला धोत्रे
*शाळेचे नाव : श्रीरंग विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल, ठाणे
गटप्रमुख व सहभागी विद्यार्थी : एकता पाल, सानिका कोलथरकर, दीपा कोतवाल, हर्ष बिडवी, केतकी भोले
प्रकल्पाचे नाव: नैसर्गिक शुद्धीकारकांचा वापर करून हवामान बदलाशी अनुकुलन
मार्गदर्शक शिक्षक : इंदु यादव
*शाळेचे नाव : सौ. ए. के. जोशी इंग्लिश मिडीयम स्कूल, ठाणे
गटप्रमुख व सहभागी विद्यार्थी : विश्वराज बोरकर, ध्रुव देवरे, अनीश हरकरे, प्रथमेश वालावलकर
प्रकल्पाचे नाव: हवेतील आद्रता व अन्नधान्य साठवणुकीचा संबंध याचा अभ्यास करणे
मार्गदर्शक शिक्षक : डॉली डे
*शाळेचे नाव : श्रीरंग
विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल, ठाणे
गटप्रमुख व सहभागी विद्यार्थी : अमोघ पाटील, ऋतुजा पाटील, कोमल साळुंखे, अरबाज शेख , लौकिक साळुंखे
प्रकल्पाचे नाव: हवेतील घटकांचा जलिय परिसंस्थेवर होणारा व त्यावरील उपाययोजना
मार्गदर्शक शिक्षक : धनश्री तरटे
*शाळेचे नाव : श्रीरंग विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल, ठाणे
गटप्रमुख व सहभागी विद्यार्थी : आकांक्षा यादव, श्रुती कोळी, हर्ष पाटील, आकाश पाटील
प्रकल्पाचे नाव: हवामानातील बदलांमुळे उद्भविणाऱ्या उष्मालहरी आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम
मार्गदर्शक शिक्षक : श्वेता सावंत