News Flash

ठाणे : घरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू; चार जखमी

रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू

ठाण्यात आंबेडकर रोड परिसरात एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाचपाखाडीतील आंबेडकर रोड परिसराच्या चाळीमधील एका घरामध्ये हा स्फोट झालाय. यामध्ये पाच जण जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतंय. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 11 च्या सुमारास संदीप काकडे यांच्या घरात हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संदीप काकडे (40), हिंमांशू काकडे (12), वंदना काकडे (50), लतिका काकडे (35) अशी जखमींची नावं आहेत. जखमींना सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 12:42 pm

Web Title: gas cylinder blast in thane one dead four injured
Next Stories
1 ठाणे: पाचपाखाडी परिसरात अज्ञातांनी 18 दुचाकी जाळल्या
2 मासुंदाकाठी नवी आसने, सेल्फी पॉइंट
3 मद्य, धिंगाण्यावर येऊरमध्ये बंदी
Just Now!
X