महसूल विभागाच्या जागेचे लवकरच मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतर

घोडबंदर किल्ल्यातील महसूल विभागाच्या ताब्यातील जागा मीरा-भाईंदरकडे हस्तांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल विभागाच्या ताब्यातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे जागा हस्तांतर करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पुढील आठवडय़ात पार पडणार असून त्यानंतर दीड ते दोन महिन्यात ही जागा मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

घोडबंदर किल्ल्याच्या परिसरात महसूल विभागाची मोकळी जागा आहे. ही जागा महापलिकेला सुशोभीकरणासाठी हस्तांतर करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आमदाराने केली होती. या जागेवर महापालिका किल्ल्याच्या मूळ वास्तूला हात न लावता उद्यान विकसित करणार आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटन वाढीस हातभार लागणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुशोभीकरणाचा प्रस्ताव जागा हस्तांतरणाअभावी रखडला होता. यासंबंधी अनेक बैठका शासन स्तरावर झाल्या परंतु हस्तांतरणाला चालना मिळत नव्हती. अखेर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे बैठक झाली. त्यात ही जमीन प्रथम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे द्यावी आणि महामंडळाने मग ती मीरा-भाईंदर महानगरपालिकेला द्यावी. दोघांनी मिळून या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित व्हावे या दृष्टीने ही जागा विकसित करावी असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला नगरविकास विभागाने अंतिम मान्यता दिली असून एक आठवडय़ात ही जागा महामंडळाकडे आणि त्यानंतर महापालिकेकडे हस्तांतर होईल. त्यामुळे येत्या पावसाळ्याच्या आधी किल्ल्यात सुशोभीकरणाचे काम सुरू करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.