ठाणे : या वर्षी पावसाळ्यात समुद्राला २० दिवस मोठे उधाण येणार आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट दरम्यान किनारपट्टीवरील भागातील पाण्याला साडे चार मीटरहून अधिक भरती येणार असून ६ जून रोजी नागरिकांना मोठी भरती अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली. या भरतीच्या वेळात जोरदार पाऊस असल्यास मुंबईसारख्या शहरात पाणी तुंबण्याती शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. या वर्षी ६ जून रोजी समुद्राला ४.८२ मीटर इतकी भरती येणार आहे. समुद्राच्या जास्त उंचीच्या भरतीचे दिवस तारीख उंची ४ जून ४.५६ मीटर ५ जून ४.७५ मीटर ६ जून ४.८२ मीटर ७ जून ४.७८ मीटर ८ जून ४.६७ मीटर ९ जून ४.५० मीटर २३ जून ४.५२ मीटर २४ जून ४.५१ मीटर ४ जुलै ४.५७ मीटर ५ जुलै ४.६३ मीटर ६ जुलै ४.६२ मीटर ७ जुलै ४.५४ मीटर २१ जुलै ४.५४ मीटर २२ जुलै ४.६३ मीटर २३ जुलै ४.६६ मीटर २४ जुलै ४.६१ मीटर १९ ऑगस्ट ४.६१ मीटर २० ऑगस्ट ४.७३ मीटर २१ ऑगस्ट ४.७५ मीटर २२ ऑगस्ट ४.६७ मीटर