ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवार, ७ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, ९ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद केला आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी या परिसरात पाणीपुरवठा सुरू राहील, तर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. बुधवार, ८ जून रोजी सकाळी ९ ते गुरुवार, ९ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पाणीबंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

‘एमआयडीसी’चा पाणीपुरवठा ६० तास बंद
ठाणे शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार, ८ जून रोजी सायंकाळी ६ ते शनिवार, ११ जून रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्रमांक -१ या परिसराचा पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे.