News Flash

दाभोलकरांचे मारेकरी शोधू शकलो नाही, हे आमचे पाप!

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आमचे सरकार शोधू शकले नाही, हे आमचे पाप आहे. मारेकऱ्यांना पकडता आले असते तर आज आम्ही

| February 27, 2015 12:55 pm

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आमचे सरकार शोधू शकले नाही, हे आमचे पाप आहे. मारेकऱ्यांना पकडता आले असते तर आज आम्ही ताठ मानेने उभे राहिलो असतो,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. ते राष्ट्रवादीच्या येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. नथुराम गोडसेची जयंती साजरी करणाऱ्यांचा धिक्कारच केला पाहिजे. पुरोगामी विचारधारा ठेचणाऱ्यांविरोधात आपण आवाज उठवणार आहे.  मग यात दाभोलकर, पानसरे यांच्यानंतर आपला तिसरा क्रमांक माझा लागला तरी चालेल. असे ते म्हणाले.

सबुरीचा सल्ला
बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजप आमदार किसन कथोरे आणि ज्येष्ठ नेते राम पातकर यांच्यावर आव्हाडांनी टीका केली. शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांनी त्यांच्या भाषणात पक्षाशी निगडित काही कार्यकर्त्यांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर आव्हाडांनी देशमुखांना सबुरीचा सल्ला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 12:55 pm

Web Title: its our sin that couldnt find assassins of dr narendra dabholkar jitendra awhad
Next Stories
1 पालिकेच्या वास्तूचा गोदाम म्हणून वापर
2 उल्हासनगरच्या माहिती अधिकाऱ्याला दंड
3 ‘बेकायदा रिक्षा वाहनतळ हटवा’
Just Now!
X