20 January 2021

News Flash

ट्रेनमधून लॅपटॉप चोरीचे प्रमाण वाढले पोलिसांच्या प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना

रेल्वेतीेल गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल लंपास करणाऱ्या टोळ्या सर्वत्र सक्रिय आहेत.

लोकल ट्रेनमधून प्रवाशांचे मोबाइल चोरी होण्याचे प्रमाण वाढले असतानाच आता चोरांनी लॅपटॉपवरही मोर्चा वळविला आहे. ट्रेनमधून लॅपटॉप चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लॅपटॉप चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वेतीेल गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल लंपास करणाऱ्या टोळ्या सर्वत्र सक्रिय आहेत. मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून दररोज किमान दहा मोबाइलची चोरी होत असते. आता अधिक फायद्यासाठी या टोळ्यांनी लॅपटॉप चोरण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. वसई रोड रेल्वे विभागात लॅपटॉप चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नोव्हेंबरअखेरीस वसईत लोकल ट्रेनमधून लॅपटॉप चोरीच्या १५ घटना उघडकीस आल्या असल्याची माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली. लॅपटॉप तसेच मोबाइल चोरांना रोखण्यासाठी लोकल ट्रेनमधून साध्या वेषातीेल पोलीस तैनात करणार असल्याचेही ते म्हणाले.
लॅपटॉप चोरी अशीे होते
या लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्यांच्या कार्यपद्धतीेबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले की, अनेकदा प्रवासी आपला लॅपटॉप लोकल ट्रेनच्या डब्याच्या वरील रॅकवर ठेवतात. चर्चगेटला बसलेले प्रवासी साधारण बोरीवलीेपर्यंत बसलेले असतात. तोपर्यंत ते वर ठेवलेल्या सामानाकडे बघत नसतात. याचाच फायदा हे चोर घेतात. एक लॅपटॉप चोरी करण्यासाठी दोन जण असतात. एक जण दारात उभा असतो आणि अन्य एक जण बसण्याच्या जागेजवळ खिडकीजवळ उभा राहतो. दारात उभा राहिलेला साथीदार खिडकीत उभ्या असलेल्या साथीदाराकडे बॅग देण्याविषयी सांगतो. तेव्हा हा साथीदार लॅपटॉपचीे बॅग काढून देतो. त्या वेळी बॅग मागितली म्हणून काढून देत आहे, असा समज होतो आणि कुणाला संशय येत नाही. लॅपटॉपची बॅग मिळताच दुसरा साथीदार लगेच पुढच्या स्थानकात उतरून पसार होतो. पाठोपाठ हासुद्धा उतरतो. जर कुणी खिडकीजवळ उभ्या असलेल्या चोरास हटकले, तर तो मी त्याला बॅग दिली असे सांगून हात झटकतो. हे आरोपी चांगल्या कपडय़ात असतात. ते नेहमी प्रथम श्रेणीच्या डब्याने प्रवास करतात. ज्या व्यक्तीचा लॅपटॉप चोरायचा असतो, त्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवून असतात, असे बागवे यांनी सांगितले.

काय काळजी घ्याल?

’लोकल ट्रेनमधून लॅपटॉप चोरला गेला किंवा गहाळ झाल्याचे लक्षात आल्यावर तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ९८३३३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करावीे.
’तक्रार दाखल करताना लॅपटॉपचे बिल, सिरियल क्रमांक देणे आवश्यक आहे.
’लॅपटॉप कधीही लोकल डब्याच्या वरच्या रॅकमध्ये ठेवू नये.
’लॅपटॉपमध्ये खाजगीे डेटा साठवून ठेवू नये. सर्व खाजगीे माहिती घरच्या पीसीत ठेवणे कधीही चांगले. या डेटाचा गैरवापर होण्याचीे शक्यता अधिक असते, असे सायबरतज्ज्ञांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 6:07 am

Web Title: laptop theft in train
Next Stories
1 विलोभनीय नागला बंदर
2 पारंपरिक उत्पादनांचा कॉर्पोरेट आविष्कार
3 धूळ, धुरात ठाणेकर गुरफटले!
Just Now!
X