ज्या प्रदेशात राहता, त्या प्रदेशातील भाषा शिका. तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ठाण्यातील सावरकरनगर भागात रविवारी चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेतर्फे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे. नसेल येत तर ती भाषा शिकायला पाहिजे. भाषा शिकल्याने जवळीकता निर्माण होते, असे भगत सिंह कोश्यारी म्हणाले.

मी ज्या प्रदेशात जातो. त्या प्रदेशाची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना मी नेहमी जवळचा वाटतो, असेही ते म्हणाले. उत्तराखंडहून रोजगारासाठी लाखो नागरिक महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मराठी शिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.