‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रम

ठाणे : पाश्चात्त्य संगीताच्या सुरावटींनी भारलेल्या अभंगांचे सादरीकरण असो की हिंदी-मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम असो, उद्याच्या शनिवारी आणि रविवारी ठाणेकरांना अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची अनुभूती घेता येणार आहे. पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ठाण्यातील तलावपाळी परिसरात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवानिमित्त येत्या शनिवारी आणि रविवारी सायंकाळी मासुंदा तलाव परिसरातील दत्त घाटाजवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ‘अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमात तरुण कलाकार अभंगांचे सादरीकरण करणार आहेत. तर रविवारी सायंकाळी जीवनगाणी निर्मित हिंदी आणि मराठी गाण्यांच्या कार्यक्रम गायिका सोनाली कर्णिक आणि गायक जयंत पिंगुळकर हे सादर करणार आहेत. या दोन्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचे  सूत्रसंचालन कुणाल रेगे करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या ठाणेकरांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. हा महोत्सव रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून त्यामध्ये दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. या विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर या वस्तूंसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज् अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. या महोत्सवातील अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार, तर दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

चिन्मय उदगीरकर, गणेश पंडित यांची उपस्थिती

‘मेकअप’ सिनेमातील अभिनेते चिन्मय उदगीरकर तसेच लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे दोघे आज, शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या पोखरण रोड येथील डय़ुरेन फर्निचर, प्लॉवर व्हॅली येथील हॉटेल खवय्ये, राम मारुती रोड येथील वोरटेक्स नेटसॉल प्रायव्हेट लिमिटेड आणि पाचपाखाडी येथील प्रशांत कॉर्नर या दुकानांना भेटी देणार आहेत. त्या वेळी त्यांना भेटण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यानंतर अभिनेते चिन्मय उदगीरकर तसेच लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित  मासुंदा तलाव परिसरातील दत्त घाट येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही उपस्थित राहतील.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत, तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डिजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरंट हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, आय लिफ रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम

  • कधी?- आज (शनिवार), ८ आणि रविवार, ९ फेब्रुवारी, वेळ- सायंकाळी ६.३० वाजता
  • कुठे?-दत्त घाट, शिवकृपा हॉटेलसमोर, मासुंदा तलाव, ठाणे (प.).