24 November 2020

News Flash

अंबरनाथमधील घटना; पत्नीचा शोध घेत पोहोचला मित्राच्या रुमवर, दरवाजा उघडताच बसला धक्का

आरोपीने महिलेची हत्या करून स्वतःला संपवलं

संग्रहित छायाचित्र

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये विचित्र घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या पत्नीचा शोध घेत पती शेवटी मित्राच्या रुमवर पोहोचला. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या मित्राच्या रुमवर पोहोचलेल्या पतीला समोर जे दिसलं ते धक्कादायक होतं. मित्राच्या रुमचा दरवाजा उघडताच होता. तर आतमध्ये पत्नीसह मित्राचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

अंबरनाथमध्ये एका फ्लॅटमध्ये गुरूवारी सायंकाळी एक पुरूष व एका स्त्रिचा मृतदेह आढळून आला होता. दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. जयंती शाह असं मृत महिलेच नाव आहे. जयंती शाह १७ नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांचे पती अजित यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. रुममध्ये आढळलेला दुसरा मृतदेह संदीप सक्सेना यांचा होता. सक्सेना अजित यांचे मित्र होते.

सक्सेना यांनी स्टोन ग्राईंडरच्या मदतीने स्वतःचा गळा चिरलेला होता. संदीपने आधी जयंती यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचं प्राथमिक अंदाजावरून पोलिसांनी सांगितलं. सक्सेना व अजित अंबरनाथमधील एका कंपनीत काम करायचे. सक्सेना नियमितपणे अजितच्या घरी येत जात असे. त्यामुळे अजित यांच्या पत्नी जयंती यांचे सक्सेना यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध होते,” अशी पोलिसांनी सांगितलं. तर सक्सेना आणि आपली पत्नी जयंतीमध्ये शारीरिक संबध होते व आपण त्याला विरोध केला होता, अशी माहिती अजित यांनी पोलिसांना दिली आहे.

१७ नोव्हेंबर रोजी जयंती बेपत्ता झाल्यानंतर अजितने संदीप सक्सेनाला कॉल केला होता. मात्र, सक्सेनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अजित यांनी गुरूवारी सक्सेनाच्या रुमवर पोहोचले होते. अजित यांनी दरवाजा वाजवला मात्र, दरवाजा उघडाच होता. त्यानंतर आत गेल्यानंतर अजित यांना जयंती आणि संदीपचे मृतदेह आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 5:41 pm

Web Title: man woman involved in extra marital affair found dead thane mumbai bmh 90
Next Stories
1 “पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही” म्हणत आदित्य ठाकरेंवर मनसेची टीका
2 मोक्षप्राप्तीसाठी त्यांनी संपवलं जीवन; गुराख्याला सापडले होते तिघांचे मृतदेह
3 बुलेट ट्रेनची नकारघंटा कायम
Just Now!
X